26 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेषविलो चीपमुळे क्रांती घडणार!

विलो चीपमुळे क्रांती घडणार!

सुपरकॉम्प्युटरला मागे टाकणाऱ्या चिपची निर्मिती, गुगलचा दावा

Google News Follow

Related

गुगलकडून क्वांटम कॉम्प्युटिंगसाठी लाँच केलेल्या विलो (Willow) नावाच्या चिपची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. या चीपचे वैशिष्ट्य म्हणजे, आता अस्तित्वात असणाऱ्या जगातल्या सर्वात फास्ट सुपरकॉम्प्युटरला जे गणित सोडवायला १० सेप्टिलियन म्हणजे एका वरती २५ शून्य एवढी वर्षं लागतील तेच गणित ही चिप ५ मिनिटांत सोडवले, असा दावा गुगलकडून करण्यात आला आहे.

क्वांटम कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रातला हा एक प्रचंड मोठा शोध असून हा आजवर तयार करण्यात आलेला उत्तम क्वांटम प्रोसेसर मानला जात आहे. क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे भौतिकशास्त्रातल्या मूलभत कणांच्या तत्त्वांचा वापर करून एक शक्तिशाली कॉम्प्युटर तयार करण्याचा प्रयत्न आहे. इतका शक्तिशाली कॉम्प्युटर ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

क्वांटम कॉम्प्युटर हा आपल्या नेहमीच्या कॉम्प्युटर पेक्षा वेगळा दिसतो. याची रचना एखाद्या ऑक्टोपस सारखी आहे. तो अतिप्रचंड थंड तापमानाला म्हणजे १५ millikelvin ला (-258.15 °C) ठेवलेला असतो. म्हणजे अंतराळातल्या तापमानापेक्षा कमी तापमानाला ठेवला जातो, कारण याच तापमानात तो काम करतो.

क्वांटम म्हणजे काय ? तर डिक्शनरीनुसार एखाद्या गोष्टीचा सर्वात सूक्ष्म कण. आपले नेहमीचे कॉम्प्युटरमध्ये माहिती कशी साठवतात, तर त्यांच्यामध्ये सिलिकनच्या चिप्सने बनलेले बिट्स असतात. असे काही हजार-लाख बिट्स एका कॉम्प्युटरमध्ये असू शकतात. 0 आणि १ ची अशी बिट्सची भाषा असते.

हे ही वाचा : 

सैफ हल्ला प्रकरणी पश्चिम बंगालमधून एका महिलेला अटक!

चेन्नईच्या किनारपट्टीवर १००० ऑलिव्ह रिडले कासव मृतावस्थेत !

पंजाबमध्ये आंबेडकर पुतळा तोडफोड प्रकरण: या अपमानाला केजरीवाल जबाबदार!

महाकुंभ: गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगींनी केले संगमात स्नान!

कॉम्पुटरमध्ये जे काही टायपिंग करतो, उदाहरणार्थ शब्द, आकडे, रंग या सगळ्याचे कॉम्प्युटरच्या भाषेत बिट्स केले जाते आणि स्टोअर केले जाते. याला कॉम्प्युटरची बायनरी सिस्टीम असे म्हटले जाते. तर क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये क्यूबिट्सचा वापर केला जातो. यात 0 किंवा १ किंवा दोन्ही एकत्र असू शकतात. या प्रक्रियेला सुपरपोझिशन म्हणतात. या क्यूबिट्समुळे, क्वांटम संगणक एकाच वेळी अनेक गणना करू शकतात, ज्यामुळे कठीण आणि गुंतागुंतीच्या समस्या देखील सहज सोडवता येतात.

क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे भौतिकशास्त्रातली गुंतागुंतीची समीकरणे सोडवता येतील. यामुळे नवीन औषधे शोधण्यासाठीच्या संशोधनाला वेग येऊ शकतो. अधिक चांगल्या इलेक्ट्रिक कार बॅटरीजच्या विकासापासून ते न्यूक्लिअर रिअॅक्टर्सपर्यंत सगळ्या आव्हानांसाठी याची मदत होईल असा विशास गुगलचा आहे. एआयच्या क्षेत्रात ही चिप खूप उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे. पण या क्वांटम कॉम्प्युटर्सचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी होण्याचीही भीती असल्याचे गुगलने सांगितले आहे. दरम्यान, क्वांटम विलो चिपचा वापर करण्यासाठी काही कालावधी लागेल असे गुगलकडून सांगण्यात आले आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा