29 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरविशेषआतिशी यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा!

आतिशी यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा!

मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा

Google News Follow

दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल म्हणजेच शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. भाजपाने ७० पैकी ४८ जागा जिंकत मोठा विजय मिळविला. तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत भाजप पुन्हा सत्तेत आली आहे. निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. ‘आप’च्या पराभवानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज (९ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता दिल्लीच्या राज्यपालांकडे राजीनामा सादर केला आहे. कालकाजी मतदारसंघातून आतिशी विजयी झाल्या तर पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला.

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांचे निवासस्थान सोडले आणि उपराज्यपालांना आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर भाजप हायकमांड मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याचा विचार करत आहे. यासाठी लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाईल, ज्यामध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे.

हे ही वाचा : 

होईल का ऑपरेशन नौ दो ग्यारह ?

आम आदमी पक्षाची चौकशी करणार, लुटलेल्याची भरपाई करावी लागणार!

उर बडवायचे तरी किती?

भाजपाचा विजय आणि केजरीवालांचा ‘तो’ व्हिडीओ; दिल्ली निवडणुकीची सोशल मीडियावर चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्यांमध्ये पहिले नाव प्रवेश वर्मा यांचे आहे. मनजिंदर सिंग सिरसा यांच्याही नावाची चर्चा आहे. वीरेंद्र सचदेवा यांचे नावही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. पूर्वांचलला आकर्षित करण्यासाठी, भाजप नेते कपिल मिश्रा यांना दिल्लीच्या नवीन मंत्रिमंडळात मंत्री बनवले जाऊ शकते. दिल्ली सरकारमध्ये एक महिला देखील मंत्री होवू शकते, ज्यामध्ये रेखा गुप्ता यांचा विचार केला जात आहे.

 

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा