दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षाच्या दोन टर्मच्या सत्तेचा अंत करत बहुमताने सत्ता मिळवली आहे. जनतेने दिलेल्या यशानंतर तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत भाजपा सत्तेत परतण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीत तीन प्रमुख पक्ष भाजपा, काँग्रेस आणि आप हे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. भाजपाने प्रचारादरम्यान ‘आप’ला लक्ष्य केले होते. तर, ‘आप’ने भाजपा आणि काँग्रेससमोर आघाडी उघडली होती. यानंतर या तिरंगी लढतीचा निकाल समोर आला आहे. आपच्या बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर आता आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे काही जुने व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
राजधानी दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली घडत असताना अरविंद केजरीवाल यांचे काही जुने व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर याची चर्चा आहे. यातील एका व्हिडीओमध्ये केजरीवाल दावा करताना दिसत आहेत की, भाजपा या आयुष्यात कधीही ‘आप’ला हरवू शकत नाही.
🚨Kitne Ghazi Aaye, Kitne Ghazi Gaye!
Arvind Kejriwal has lost from New Delhi
RT MAX! 👏👏👏 pic.twitter.com/paOVHgsf93
— BALA (@erbmjha) February 8, 2025
२०२३ मध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की दारू धोरण प्रकरण, ज्यामध्ये वरिष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती, ते भाजपचे षड्यंत्र होते. ते म्हणाले होते की, मी नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, या जन्मात तुम्ही दिल्लीत आम आदमी पक्षाला हरवू शकत नाही. तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल. तुम्ही या जन्मात दिल्लीत आम आदमी पक्षाला हरवू शकत नाही. त्यांचा उद्देश आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कोणत्याही प्रकारे अटक करणे आणि आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकारला विखुरणे आहे. अशा प्रकारे, नरेंद्र मोदीजी दिल्लीत सरकार स्थापन करू इच्छितात. त्यांना माहित आहे की ते निवडणुकीत त्यांना हरवू शकत नाहीत, म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही केजरीवाल यांना तुरुंगात टाकले तरी आम आदमी पक्षाचे सरकार तुरुंगातूनही जिंकेल.”
हे ही वाचा..
आम आदमी पक्षाचे यमुनेत विसर्जन; भाजपाने केली दिल्ली काबीज!
‘दिल्लीत इंडी आघाडी असती तर भाजपाला २० पेक्षा अधिक जागा मिळाल्या नसत्या!’
केजरीवाल म्हणतात रचनात्मक विरोधी पक्षाचे काम करू
दिल्ली सचिवालयातून कोणतेही कागद, फाइल्स बाहेर जाता कामा नयेत!
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून यावर लोक चर्चा करत आहेत. निकाल भाजपाच्या बाजूने लागल्याने खिल्ली देखील उडवली जात आहेत. भाजपने आपचे प्रमुख केजरीवाल यांना केवळ चुकीचे सिद्ध केले नाही तर त्यांना त्यांच्या नवी दिल्ली मतदारसंघातून आमदारही बनू दिले नसल्याचे म्हटले जात आहे. २०१३ पासून या जागेवरून निवडणूक लढवणारे केजरीवाल भाजपाच्या परवेश वर्मा यांच्याकडून पराभूत झाले.