दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार आता जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर सचिवालयातील कोणत्याही फाइल्स, कोणतेही कागदपत्र परवानगीशिवाय बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची सत्ता दिल्लीत १० वर्षे होती. आता आतिशी मार्लेना या मुख्यमंत्री होत्या. पण या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भाजपाचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सचिवालयातील कोणत्याही फाइल्स बाहेर पाठवता येणार नाहीत, असे आदेश दिल्ली प्रशासन विभागाने काढले आहेत. या विभागातर्फे अशी नोटीस जारी करण्यात आली आहे की, सचिवालय तात्पुरते बंद करण्यात आले असून तेथील कोणतीही कागदपत्रे परवानगीविना बाहेर नेता येणार नाहीत.
या पत्रात म्हटले आहे की, कोणत्याही फाइल, कागदपत्रे, संगणकाचे हार्डवेअर, दिल्ली सचिवालयाच्या बाहेर नेता येणार नाही. प्रशासन विभागाची परवानगी त्याआधी घ्यावी लागेल. सचिवालयातील सर्व विभागांना तशा सूचना देण्यात आल्या असून या सगळ्या कागदपत्रांची, फाइल्सची सुरक्षितता पाहिली जावी असे या आदेशात म्हटले आहे.
हे ही वाचा:
नवीन आयकर विधेयक सोमवारी लोकसभेत !
‘आप’ला धक्का! अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया पराभूत; आतिशी यांचा विजय
दिल्लीत आप, काँग्रेसची परिस्थिती पाहून ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट!
मोरे महाराजांच्या मृत्यूचे ओझे कोणाच्या खांद्यावर?
केजरीवाल यांचे सरकार असताना मद्य घोटाळ्याचे आरोप झाले होते. अनेक आरोप आम आदमी पक्षावर करण्यात आले होते. त्याचा विचार करता सचिवालयातील कागदपत्रे नेली जातील असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कोणतीही कागदपत्रे सचिवालयाच्या बाहेर काढू नयेत, असे हे आदेश आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला आहे. त्यांना २३ जागी विजय मिळाला असून भाजपाने बहुमताचा आकडा पार करत ४७ जागी विजय मिळविला आहे. त्यामुळे आता भाजपाचे सरकार इथे येणार हे स्पष्ट झाले आहे. तेव्हा सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणजे हे आदेश आहेत.