‘आप’ची हॅट्रिकसाठी तर भाजपची २७ वर्षांनंतर सत्तेत येण्यासाठी निवडणूक लढाई सुरू होती. अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. दिल्ली निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे दिसत असून आपला काही ठिकाणी आघाडी घेता आली असली तरी त्यांचे प्रमुख नेते पराभवाच्या छायेत असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसने मात्र खातेही उघडलेले नाही.
दिल्ली निवडणुकीत ‘आप’ला मोठा हादरा बसला असून त्यांच्या हातून सत्ता गेली आहे. शिवाय नवी दिल्ली मतदासरंघात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या आपच्या प्रमुख नेत्याला पर्भावाचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघात भाजप उमेदवार परवेश वर्मा यांचा विजय झाला आहे. दुसरीकडे आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास १२०० मतांनी पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून पराभूत झाले असून भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी ही जागा १८४४ मतांनी जिंकली आहे. तर अपच्या नेत्या आतिशी यांचा विजय झाला असून आपला थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यांनी भाजपा उमेदवार रमेश बिधुरी यांचा पराभव केला आहे.
हेही वाचा..
२७ वर्षानंतर पुन्हा भाजप येत आहे
नवीन आयकर विधेयक सोमवारी लोकसभेत !
दारूवर लक्ष केंद्रित केल्यामुळेच ‘आप’चा पराभव
दिल्ली निवडणुकीत काँग्रेस, आप एकत्र राहिले असते तर बरे झाले असते
भाजपाने आम आदमी पक्षाच्या दोन टर्मच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा ४८ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. यानुसार दिल्लीत भाजपाची सत्ता येणार हे जवळपास निश्चित आहे. दिल्लीत आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. ७० जागांसाठी ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.