दिल्लीत आम आदमी पक्षाच्या दारूण पराभवानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘आप’ रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावेल आणि दिल्लीच्या जनतेची सेवा करत राहील. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे. आम्ही जनतेचा जनादेश मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या विजयासाठी मी भाजपचे अभिनंदन करतो आणि मला आशा आहे की, लोकांनी त्यांना ज्या आश्वासनांसाठी मतदान केले आहे ते सर्व ते पूर्ण करतील, असे केजरीवाल यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
केजरीवाल म्हणाले की, ‘आप’ रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावेल आणि दिल्लीतील लोकांची सेवा करत राहील. गेल्या १० वर्षांत आम्ही आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. आम्ही केवळ विधायक विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर लोकांमध्ये राहून त्यांची सेवा करत राहू, असेही ते म्हणाले.
हेही वाचा..
दिल्ली सचिवालयातून कोणतेही कागद, फाइल्स बाहेर जाता कामा नयेत!
‘आप’ला धक्का! अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया पराभूत; आतिशी यांचा विजय
२७ वर्षानंतर पुन्हा भाजप येत आहे
नवीन आयकर विधेयक सोमवारी लोकसभेत !
नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. वर्मा यांना ३००८८ मते मिळाली, तर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना २५९९९ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांना ४५६८ मते मिळाली.