दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आणि त्यात आम आदमी पक्षाची पुरती हार झाल्यानंतर एकेकाळी याच पक्षाच्या सोबत असलेले कवी कुमार विश्वास तसेच याच पक्षाच्या विद्यमान खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
कुमार विश्वास म्हणतात की, दिल्लीच्या जनतेने जो जनादेश दिला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्ते हे अण्णा हजारे आंदोलनातून पुढे आले. पण भारतीय राजकारणाला बदलण्याची त्यांची जी इच्छा होती, त्याची हत्या एका नीच, निर्लज्ज, मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या, आत्ममुग्ध आणि एका चरित्रहीन व्यक्तीने केली. त्याच्या प्रती कोणती संवेदना व्यक्त करावी?
कुमार विश्वास म्हणाले की, दिल्लीला केजरीवालपासून मुक्ती मिळाली. आम आदमी पक्षात जे लोक सत्तेचा लोभ, पद यासाठी राहिले होते, ते लोकही आता परतणार आहेत. काही लोक आपापल्या व्यवसायात मन गुंतवतील, काही लोक आपापल्या क्षेत्रात काम करू लागतील.
हे ही वाचा:
केजरीवाल म्हणतात रचनात्मक विरोधी पक्षाचे काम करू
दिल्ली सचिवालयातून कोणतेही कागद, फाइल्स बाहेर जाता कामा नयेत!
दिल्लीचे तख्त कोण राखणार? सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची मुसंडी
मोरे महाराजांच्या मृत्यूचे ओझे कोणाच्या खांद्यावर?
माझ्यासाठी या निकालानंतर कोणताही आनंदाचा किंवा दुःखाचा विषय नाही. प्रसन्नता याची आहे की, कोट्यवधी लोकांनी आशा बाळगली होती की, लोक आपले व्यवसाय, कामधंदे सोडून केजरीवाल यांच्या त्या आंदोलनात सहभागी झाले होते. पण त्या सगळ्यांच्या स्वप्नांची हत्या एका चरित्रहीन व्यक्तीने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी केली आहे. त्याला त्याची शिक्षा मिळाली आहे, पण बाकी पक्ष त्यातून बोध घेतील, अहंकार बाळगणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असेही विश्वास म्हणाले.
आम आदमीच्या कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे की, ज्या व्यक्तीने आपल्या मित्रांच्या पाठीत खंजिर खुपसला, गुरूला धोका दिला, आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना घरी आणून मारहाण केली, आपल्या वैयक्तिक लाभासाठी जनतेचा पैसा उपयोगात आणला, त्याच्याकडून आता आशा ठेवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
रावणाचाही अहंकार चक्काचूर झाला!
सध्या आम आदमी पक्षातच असलेल्या आणि राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी प्रचारादरम्यान केजरीवाल यांच्या धोरणांवर जबरदस्त टीका केली होती. त्याचा परिणामही केजरीवाल यांना पाहायला मिळाला. निकालानंतर त्या म्हणाल्या की, घमेंड आणि अहंकार अनेक दिवस चालत नाही.. रावणाची घमेंड जिथे मातीत मिसळली तिथे केजरीवाल काय चीज आहे. त्यामुळे वास्तव हे आहे की, त्यांच्या कथनी आणि करणी यात फरक होता. एका खासदार महिलेला घरी बोलावून तिला मारहाण केली तर अशा व्यक्तीला लोक माफ करतील? ज्यांनी माझे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना स्वतःची सीट वाचविणेही शक्य झाले नाही. देव आहे, हेच निकालाने दाखवून दिले. हा पक्ष काही एक दोन लोकांची जागीर नाही. आम आदमी पार्टीसाठी आम्ही देखील रक्त आटवले आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाची खासदार म्हणून मी काम करत आले आहे, करत राहीन.