31 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरदेश दुनियापंतप्रधान मोदींनी तुलसी गॅबार्ड यांची भेट घेत दिले महाकुंभातील गंगाजल!

पंतप्रधान मोदींनी तुलसी गॅबार्ड यांची भेट घेत दिले महाकुंभातील गंगाजल!

तुलसी गॅबार्ड यांनी दिली तुळशीची माळ 

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१७ मार्च) नवी दिल्ली येथे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक (डीएनआय) तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी नुकत्याच संपन्न झालेल्या महाकुंभातील गंगाजल भेट म्हणून दिले. यावेळी तुलसी गॅबार्ड यांनी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून तुळशीची माळ दिली. दरम्यान, बहुराष्ट्रीय दौऱ्याचा भाग म्हणून गॅबार्ड अडीच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

तुलसी गॅबार्ड यांनी भेट म्हणून पंतप्रधान मोदींना दिलेल्या तुळशीच्या माळेला ‘तुळशीचे मणी’ देखील म्हटले जाते. हिंदू धर्मात, विशेषतः भगवान श्रीकृष्णाच्या अनुयायांसाठी खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाचे भक्त, ज्यांना विष्णुप्रिया किंवा ‘विष्णूची प्रिय’ म्हणून ओळखले जाते, ते त्यांच्या भक्तीचे प्रतीक म्हणून तुळशीचे माळ घालतात. असे मानले जाते की हे मणी नकारात्मक ऊर्जा आणि वाईट स्वप्नांपासून संरक्षण देतात.

गॅबार्ड यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर काही तासांतच ही बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमधील संरक्षण आणि सुरक्षा संबंध वाढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. नवी दिल्लीत अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांना भेटून आनंद झाला. आम्ही संरक्षण आणि माहितीच्या देवाणघेवाणीसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली, ज्याचा उद्देश भारत-अमेरिका भागीदारी आणखी दृढ करणे आहे, असे राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर सांगितले.

हे ही वाचा  : 

उत्तर प्रदेश: परीक्षेसाठी आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सपा नेत्याकडून अत्याचार!

गौण खनीज त्याच भूखंडावर वापरण्यासाठी रॉयल्टी माफ

आरएसएस संस्कार देणारी संघटना

पंतप्रधान मोदी शांतिदुत, मित्र; मुलाखतकार फ्रिडमनने विरोधकांना खिजवले

हिंदू धर्म मानणाऱ्या गॅबार्ड यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चांगल्या आणि कठीण काळात भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणींमधून बळ आणि मार्गदर्शन मिळते. दरम्यान, रविवारी पहाटे त्या नवी दिल्लीत आल्या आणि त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांशी गुप्तचर सहकार्य, सायबर सुरक्षा आणि संरक्षण संबंधांवर चर्चा केली.

फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यानंतर त्यांची ही भेट आहे, जिथे त्यांनी गॅबार्ड यांची भेट घेतली आणि त्यांना भारत-अमेरिका संबंधांचे एक मजबूत समर्थक म्हणून वर्णन केले. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत तुलसी गॅबार्ड सहभागी झाल्या, ज्यामध्ये सुमारे २० देशांच्या गुप्तचर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश होता.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा