उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणारा आरोपी शाळेचा व्यवस्थापक आणि समाजवादी शिक्षक संघटनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. जनार्दन यादव असे या आरोपीचे नाव आहे. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सोमवारी (१७ मार्च) सांगितले.
पोलिस अधीक्षक (एसपी) ओमवीर सिंह यांनी सांगितले की, पिडीत विद्यार्थिनीच्या काकांच्या तक्रारीवरून, आरोपी जनार्दन यादवविरुद्ध रविवारी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.
पिडीत विद्यार्थिनीच्या काकांच्या तक्रारीनुसार, गाझीपूर जिल्ह्यातील करिमुद्दीनपूर पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी भीमपुरा पोलिस स्टेशन परिसरातील एका शाळेत दहावीची परीक्षा देण्यासाठी आली होती. १ मार्च रोजी गणिताच्या परीक्षेच्या दिवशी शाळेचे व्यवस्थापक जनार्दन यादव याने विद्यार्थिनीला मदत करण्याच्या बहाण्याने शाळेतील एका खोलीत घेऊन गेले आणि तिथे विद्यार्थिनीवर बलात्कार केला.
हे ही वाचा :
गौण खनीज त्याच भूखंडावर वापरण्यासाठी रॉयल्टी माफ
व्हीएतनाम दौऱ्यात दडले आहे काय?
पाकिस्तानात कॉल सेन्टरवरील छापेमारीत लोकांनी घुसून केली लुटालूट!
याबाबत कोणाला माहिती दिल्यास आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, या घटनेमुळे पिडीत अल्पवयीन मुलगी घाबरली होती. याबाबत तिला विचारले असता तिने रडत रडत घटनेची सर्व माहिती सांगितली.
एसपींनी सांगितले की, पिडीत विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. घटनेची माहिती मिळताच, रासरा पोलिस उपअधीक्षक आशिष मिश्रा यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. यानंतर आरोपी जनार्दन यादवला अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.