32 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरराजकारणबसपातून निलंबित आकाश आनंद मायावतींच्या पायांशी

बसपातून निलंबित आकाश आनंद मायावतींच्या पायांशी

सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

Google News Follow

Related

बहुजन समाज पार्टीतून (बसपा) निलंबित करण्यात आलेले, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांनी मायावतींची माफी मागितली आहे. यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा बसपामध्ये काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

आकाश आनंद यांनी स्पष्ट केले की, “बहुजन समाज पार्टीच्या हितासाठी मी माझे नातेसंबंध – विशेषतः माझ्या सासरच्यांना त्यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू देणार नाही.” आकाश यांनी हेही सांगितले की, “मी माझ्या कोणत्याही राजकीय निर्णयासाठी कुठल्याही नातेवाईक किंवा सल्लागारांचा सल्ला घेणार नाही आणि केवळ बहनजींच्या (मायावतींच्या) दिलेल्या सूचनांचेच पालन करीन.”

सोशल मीडियावर आकाश यांनी भावनिक पोस्ट लिहिली. रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर आकाश आनंद यांनी सलग अनेक पोस्ट केल्या. त्यांनी लिहिले: बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा, यूपीच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि लोकसभा-राज्यसभेच्या अनेक वेळा सदस्य राहिलेल्या बहन मायावती जी यांना मी माझ्या मनापासून एकमेव राजकीय गुरू व आदर्श मानतो. आज मी प्रण करतो की, बसपाच्या हितासाठी मी माझ्या वैयक्तिक नात्यांना – विशेषतः माझ्या सासरच्यांना  त्यात कधीही येऊ देणार नाही.

हे ही वाचा:

उबाठात बिघाडी एकनाथ शिंदेंकडे घाडी

पवन कल्याण यांच्या मुलाला भारतीय कामगारांनी वाचवले, सिंगापूर सरकारकडून सन्मान

८५० बैल आणि ३५० बुलफायटर्सचा पराक्रम बघा

“तो आला… त्याने पाहिलं… आणि शतकं झुकली!”

तसेच त्यांनी मागील काही दिवसांत सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टबद्दलही खेद व्यक्त केला आणि लिहिले:

“काही दिवसांपूर्वी मी जो पोस्ट केला होता, त्याबद्दल मी माफी मागतो, कारण त्यामुळे बहनजींनी मला पार्टीतून काढले. यापुढे मी हे सुनिश्चित करीन की, मी कोणत्याही राजकीय निर्णयासाठी कुणाचाही सल्ला घेणार नाही, फक्त बहनजींचे मार्गदर्शन आणि वरिष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवतच काम करीन.”

आकाश यांनी असेही म्हटले आहे की, कृपया माझ्या सर्व चुका माफ करून मला पुन्हा एकदा पार्टीत काम करण्याची संधी द्या. मी सदैव तुमचा आभारी राहीन. यापुढे मी अशी कोणतीही चूक करणार नाही, ज्यामुळे पार्टीच्या किंवा बहनजींच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा