आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा लहान मुलगा मार्क शंकर हा नुकत्याच आगीच्या घटनेत जखमी झाला होता. सिंगापूरमध्ये रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी मार्क शंकर आता हैदराबादला परतला आहे. दरम्यान, मार्क शंकर आणि इतर मुलांना भीषण आगीतून वाचवणाऱ्या चार भारतीय स्थलांतरित कामगारांचा सिंगापूर सरकारने सन्मान केला आहे. कामगारांना त्यांच्या धाडसी कृत्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
८ एप्रिल रोजी ही आगीची घटना घडली होती. शाळेत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले होते. या जखमींमध्ये उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर याचाही समावेश होता. उपचारानंतर मार्क शंकर आता घरी परतला आहे.
ईटीव्ही भारतच्या बातमीनुसार, सिंगापूरच्या अधिकृत सूत्रांनुसार, ज्या वेळी हा अपघात झाला. त्यावेळी जवळच चार भारतीय कामगार बांधकामाच्या कामात गुंतले होते. यावेळी त्याला मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. याच दरम्यान, क्षणाचा विलंब न करता भारतीय कामगार घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले. इमारतीत अडकलेल्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी या लोकांनी आपले जीव धोक्यात घातले.
हे ही वाचा :
एशियन योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपसाठी सोनीपत येथे ट्रायल सुरू
काँग्रेसच्या कन्हैय्याकुमारचे नरेंद्र मोदी, अमित शहा, रा.स्व. संघाविरोधात आकांडतांडव
भारतात आयफोनचे उत्पादन ६० टक्क्यांनी वाढले
भारतीय कामगारांच्या या शौर्याचे सिंगापूर सरकारने कौतुक केले आहे. सरकारने म्हटले आहे की या लोकांनी इतरांना वाचवण्यासाठी आपले जीवन धोक्यात घातले. या भारतीय कामगारांच्या त्वरित कारवाईमुळेच मुलांचे प्राण वाचले, असे सरकारने म्हटले आहे. यासाठी कितीही कौतुक केले तरी ते अपुरे असल्याचे सिंगापूर सरकारने म्हटले आहे.