28 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरक्राईमनामाकर्नाटकात “पाकिस्तान झिंदाबाद”च्या घोषणा दिल्याबद्दल केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

कर्नाटकात “पाकिस्तान झिंदाबाद”च्या घोषणा दिल्याबद्दल केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

पोलिसांकडून १० हून अधिक जणांना अटक

Google News Follow

Related

कर्नाटकातील मंगळुरू येथे स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान “पाकिस्तान झिंदाबाद” असे घोषणा दिल्याबद्दल जमावाने एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यानंतर पोलिसांनी १० हून अधिक जणांना अटक केली आहे.

कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून त्यांनी सांगितले की, पीडित व्यक्तीचा तात्काळ मृत्यू झाला नसून आधी जखमी झाल्याने मरण पावला. त्यांनी असेही सांगितले की सविस्तर अहवालाची वाट पाहत आहे आणि या प्रकरणात अटकही करण्यात आली आहे. “एका अज्ञात व्यक्तीला जमावाकडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. मला माहिती मिळाली की स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान ती व्यक्ती ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देत होता. त्यामुळे काही लोकांनी त्याला मारहाण केली. तो जागीच मरण पावला नसून नंतर मरण पावला. अद्याप संपूर्ण अहवाल मिळालेला नाही. सुमारे १० ते १२ जणांना अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.

रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एका क्रिकेट स्पर्धेमध्ये दहा संघ आणि १०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पीडित आणि सचिन नावाच्या व्यक्तीमध्ये झालेल्या हाणामारीने हिंसाचार सुरू झाला. याचे रुपांतर सामूहिक हल्ल्यात झाले. काही उपस्थितांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु जमावातील काही जण काठ्या आणि लाथांनी त्या व्यक्तीला मारहाण करत राहिले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

हे ही वाचा..

चीन : भीषण आगीत २२ जणांचा मृत्यू

मग पाकिस्तानचा श्वासही बंद केला जाईल

पहलगाम हल्ल्यावेळी ‘अल्लाहु अकबर’ची घोषणा ‘नैसर्गिक’

२०२५ मध्ये फ्रेशर्स आणि टेक टॅलेंटसाठी प्रचंड मागणी

पुढे रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदनात आढळून आले की, संबंधित व्यक्तीच्या पाठीवर वारंवार वार केल्याने अंतर्गत रक्तस्त्राव आणि मुका मार बसून त्याचा मृत्यू झाला. ३३ वर्षीय स्थानिक रहिवासी दीपक कुमार यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) १९ जणांची नावे आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल डेटाच्या विश्लेषणातून आणखी संशयितांची ओळख पटण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा