30 C
Mumbai
Thursday, December 25, 2025
घरराजकारणपुण्यश्लोक अहिल्यादेविंच्या जीवनावर राज्य सरकारकडून चित्रपट निर्मिती

पुण्यश्लोक अहिल्यादेविंच्या जीवनावर राज्य सरकारकडून चित्रपट निर्मिती

राज्य सरकारने चौंडीत घेतले महत्त्वाचे निर्णय

Google News Follow

Related

मंगळवारी अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या ऐतिहासिक कॅबिनेट मिटिंगची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती.

यात पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जीवनचरित्रावर एक भव्य चित्रपट शासनाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणारा आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त मराठी नव्हे तर विविध भाषेत तयार केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी उच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणाची सोय होणार आहे. या निमित्ताने विविध आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.

यशवंत विद्यार्थी योजना

‘यशवंत विद्यार्थी योजना’ ही योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत १०,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृहाची निर्मितीही केली जाणार आहे.

आदिशक्ती अभियान

मुलींसाठी अहिल्यानगरमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्याचे ठरविण्यात आले. महिला आणि संस्थांना ‘आदिशक्ती पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत.

हे ही वाचा:

भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर माधुरी दीक्षित माझी!

युद्धजन्य परिस्थितीत काय करावे? ३३ राज्यांत होणार मॉक ड्रील

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सबरीमाला मंदिराला देणार भेट!

राज्यातील ‘या’ १६ शहरात होणार ‘मॉक ड्रिल’!

मंदिर विकास

राज्यातील प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी तब्बल ५,५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये खालील प्रकल्पांचा समावेश आहे:

  • त्र्यंबकेश्वर विकास: २७५ कोटी रुपये
  • श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास: १,४४५ कोटी रुपये
  • श्री क्षेत्र माहुरगड विकास: ८२९ कोटी रुपये
  • श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर विकास: १,८६५ कोटी रुपये
  • श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास: २५९ कोटी रुपये
  • अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार: १४७ कोटी रुपये
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा