26 C
Mumbai
Friday, December 19, 2025
घरविशेषदहशतवाद्यांच्या अंत्यविधीत पाकचे लष्कर!

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीत पाकचे लष्कर!

लष्कर ए तोयबाचे प्रमुख कमांडर मारले गेले

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने आज बदला घेतला. पाकिस्तान आणि पिओके येथील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करून टाकले. हवाई हल्ला करत दहशतवाद्यांचे एकूण ९ स्थळ उध्वस्त करून टाकले आहेत. भारताच्या या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, जैश-ए-मोहम्मदचे कमांडर देखील या हल्ल्यात ठार झाले आहेत.

हल्ल्याचे व्हिडीओ आणि झालेल्या नुकसानीचे व्हिडीओ आता समोर येवू लागले आहेत. याच दरम्यान, पाकिस्तानमधून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीमध्ये पाकचे लष्कर उपस्थित राहिल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाक लष्कराचा बुरखा फाटला आहे. कारण, पाक सरकार आणि लष्कराची दहशतवाद्यांबरोबर असलेली मिली भगत उघड झाली आहे. दहशतद्यांबरोबर संबंध नसल्याची बतावनी करणारे पाक लष्कर आज तोंडावर पडले आहे.

भारताच्या हवाई हल्ल्यात दहशतवादी अब्दुल रौफ मारला गेला आणि आज त्याचा अंत्यविधी पार पडला. अब्दुल रौफच्या दफनविधीवेळी पाक लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित होते. स्थानिक लोक, लष्करी कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसले. या घटनेनंतर पाकिस्तानचे पितळ उघडे पडले.

हे ही वाचा : 

आता कुठे खेळ सुरू झालाय…

राज ठाकरे काय बोलतात याला काही महत्व नाही!

हनुमानाच्या आदर्शांचं पालन करत घेतला बदला

ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताकडून जगाला दिला गेलेला दहशतवादाविरोधातला स्पष्ट संदेश

तसेच भारताच्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाचे टॉप कमांडर आणि दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये हुजैफा (मसूद अजहरचा भाऊ आणि रौफ असगरचा मुलगा), अब्दुल मलिक (मुरीदके), मुदस्सीर (मुरीदके), कमांडर खालिद मोहम्मद आलम, कारी मोहम्मद इक्बाल मुख्य कमांडर, शाहीन मकसूद (मदारपूर, लिपा व्हॅली-पिओके), याकुब मुघल (बिलाल कॅम्पचा प्रमुख) वकास (बिलाल कॅम्प-मुझफ्फराबाद), हसन (बिलाल कॅम्प-मुझफ्फराबाद) यांचा समावेश आहे. यासह मसूद अजहरच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाला आहे. याच्यासह त्याच्या जवळच्या चार सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा