आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्रांतात प्रतिस्पर्ध्याला न बोलता कोलण्याचे जे कौशल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साध्य झाले ते क्वचितच कुणाला साध्य झाले असेल. काल परवा नाटोचे (नॉर्थ अटलांटीक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सरचिटणीस मार्क रूट यांनी रशियन तेलाच्या मुद्द्यावरून भारताला धमकावले होते. त्याच नाटोचे अत्यंत महत्वाचे सदस्य राष्ट्र असलेल्या यूनायटेड किंगडमने आज भारताशी मुक्त व्यापार करार केला. या करारानंतर यूकेचे पंतप्रधान स्टारमर यांनी हा यूकेचा खूप मोठा विजय असल्याचे विधान केले आहे. स्टारमर यांचे हे भाष्य म्हणजे मार्क रुट यांना लगावलेली चपराक आहे. या थप्पडेचे ध्वनी रुट यांचे मालक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत.



