पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख, गृहमंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी अखेर भारतासमोर शरणागती पत्करली आहे. त्यांनी ट्रॉफी प्रकरण आणि भारतीय खेळाडूंवर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल माफी मागितली आहे. भारतीय संघाकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर, नक्वी ट्रॉफी घेऊन गायब झाले. याचा केवळ भारतातूनचं नव्हे तर पाकिस्तानमधूनही मोठ्या प्रमाणात निषेध झाला.
सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांच्यासह पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतले. यावेळी बोर्डाचे प्रमुख नक्वी एकटे ट्रॉफी देण्यासाठी म्हणून वाट पाहत होते. दुसरीकडे, भारताने आधीच भूमिका घेतली होती की, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही. असे असूनही, त्यांनी ट्रॉफी देण्याचा आग्रह धरला, परंतु जेव्हा प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा ते ट्रॉफी घेऊन निघून गेले.
भारताने आशिया कप २०२५ स्पर्धा जिंकून काही तास झाले तरीही संघाला ट्रॉफी मिळाली नाही. या घटनेनंतर बीसीसीआयने संताप व्यक्त केला. शिवाय थेट दुबई पोलिसांमध्ये ट्रॉफी चोरीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. यादरम्यानच आता आशियाई क्रिकेट कौन्सिलची दुबईत बैठक झाली. या बैठकीमध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोहसीन नक्वी यांच्यावर टीका केली. यावेळी इतर सर्व देश भारताच्या बाजूने उभा दिसले. बीसीसीआयने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर पाक क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी अखेर बीसीसीआयकडे माफी मागितल्याचे अनेक अहवालात म्हटले आहे.
हे ही वाचा..
आर्थिक शिस्तीशिवाय सैन्यशक्ती टिकवता येत नाही
ओम बिरला यांची उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्याशी भेट
श्री नैना देवी मंदिरात रामनवमीला सिद्धिदात्री स्वरूपाची पूजा
आरबीआयने आयपीओ कर्ज मर्यादा दुप्पट केली
बैठकीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी म्हटले की, जे घडले ते चुकीचे आहे. आपण नव्याने सुरू करू. मी माफी मागतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने येऊन आशिया चषक घेऊन जावा. आता यावर बीसीसीआय नेमकी काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.







