32 C
Mumbai
Friday, March 6, 2026
घरक्राईमनामा“हडळ” स्वतःच्या लोकांना मारतेय! पाक सैन्य आणि सरकारबद्दल पीओकेमधील नेते काय म्हणाले?

“हडळ” स्वतःच्या लोकांना मारतेय! पाक सैन्य आणि सरकारबद्दल पीओकेमधील नेते काय म्हणाले?

पीओकेमध्ये जनतेकडून सरकारविरोधात निदर्शने सुरू

Google News Follow

Related

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) जनतेकडून सरकारविरोधात निदर्शने सुरू असून मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. मुलभूत हक्कांसाठी सुरू असलेल्या या निदर्शनांदरम्यान पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला यात काही निदर्शकांचा मृत्यू झाला. यावेळी केलेल्या एका भाषणात, अवामी कृती समितीचे (एएसी) वरिष्ठ नेते शौकत नवाज मीर यांनी पाकिस्तानी सरकारसह सैन्यावर टीकास्त्र डागले. त्यांनी सैन्य आणि सरकारची तुलना “लोकांना मारणारी हडळ” अशी केली आहे.

पीओकेमध्ये निदर्शने तीव्र होत असताना मीर यांनी म्हटले आहे की, “आमचा संघर्ष एका व्यक्तीविरुद्ध नाही तर संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध आहे.” हा लोकांचा संघर्ष आहे, एकत्रितपणे येऊन या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवू, असं आवाहन त्यांनी पुढे केले आहे. पाकिस्तानी सैन्याने निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात १२ नागरिकांचा मृत्यू झाला आणि २०० हून अधिक जखमी झाले. मात्र, असे असतानाही पीओकेमध्ये लोकांनी पुकारलेल्या अनिश्चित काळासाठीच्या संप आणि निषेधाच्या तिसऱ्या दिवशी हे विधान आले. पाकिस्तानी रेंजर्स आणि इस्लामाबाद पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलिसही ठार झाले, तर नऊ जण जखमी झाले.

हे ही वाचा : 

पंतप्रधानांकडून १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण; पहिल्यांदाच चलनावर भारत मातेचे चित्र!

संतापजनक! “महिला जमिनीवर बाळंत झाली, नर्स म्हणाली – ‘मजा आली का?’”

पीओकेमध्ये हिंसक आंदोलन; पाक सैन्याच्या गोळीबारात १२ ठार!

गोधऱ्यात ३५ बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर

पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी हिंदूंना ‘काफिर’ म्हणून संबोधले होते त्या वादग्रस्त विधानाचा संदर्भ देत मीर म्हणाले की, ते भारतावर अत्याचाराचे आरोप करतात, त्यांचे स्वतःचे हात काश्मिरींच्या रक्ताने माखलेले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, सामन्यांचा आवाज दाबला जात आहे. स्थानिक माध्यमे बंद केली जात आहेत आणि निदर्शकांना शत्रू मानले जात आहे. आमची मागणी स्पष्ट आहे. जोपर्यंत आपण हे साध्य करत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा