28.6 C
Mumbai
Thursday, August 13, 2026
घरक्राईमनामारेवण्णाच्या कोठडीतून जप्त केलेल्या फोनमध्ये ९० अश्लील व्हिडिओ

रेवण्णाच्या कोठडीतून जप्त केलेल्या फोनमध्ये ९० अश्लील व्हिडिओ

नवा गुन्हा दाखल

Google News Follow

Related

बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कर्नाटकातील माजी जनता दल (सेक्युलर) खासदार प्रज्वल रेवण्णा पुन्हा चर्चेत आला आहे. बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा केंद्रीय कारागृहातील त्याच्या सेलवर छापा टाकल्यानंतर मोबाईल फोन, पेनड्राइव्ह आणि चार्जर जप्त करण्यात आले. या मोबाईलमध्ये तब्बल ८० ते ९० अश्लील व्हिडीओ आढळल्याचा दावा केंद्रीय गुन्हे शाखेच्या सूत्रांनी केला आहे. या प्रकरणी नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उच्चप्रोफाइल कैद्यांच्या सेलची तपासणी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. सुमारे चार ते पाच तास झडती सुरू होती. मोबाईलमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आणि वर्तमानपत्रातील कात्रणेही सापडल्याचे वृत्त आहे. बहुतांश व्हिडीओ भारतीय असल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

जप्त मोबाईलचा फॉरेन्सिक तपास सुरू असून, व्हिडीओ आणि इतर डिजिटल माहितीची छाननी केली जात आहे. हा फोन कारागृहात कसा पोहोचला, त्याचा वापर नेमका कोणी केला आणि त्यातील सामग्रीचा रेवण्णाविरोधातील अन्य प्रकरणांशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.

हे ही वाचा:

पाक गृहमंत्र्यांकडून हाफिज सईदचे गुणगान; भारताला धमकी

दिल्लीतील लाल किल्ला स्फोटामागे अल-कायदा?

३६ वर्षांनंतर काश्मिरी पंडित पिता-पुत्र हत्याकांडाची फाईल पुन्हा उघडली

नीट आंदोलनावर चर्चेसाठी अमित शहांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

दरम्यान, कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रतिबंधित मोबाईल सेलमध्ये आढळल्याने सहाय्यक अधीक्षकाला निलंबित, तर बंगळुरू केंद्रीय कारागृहाच्या अधीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये विशेष न्यायालयाने रेवण्णाला बलात्कार, व्हॉययुरिझम आणि पुरावे नष्ट केल्याच्या गुन्ह्यांत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर जन्मठेप स्थगित करून अंतरिम जामीन देण्याची त्याची मागणी कर्नाटक उच्च न्यायालयानेही फेटाळली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा