28.9 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरक्राईमनामाभांडुपच्या डोंगराळ भागात गांजाची रोपे; 'ड्रग्स' शेतीच्या संशयाने खळबळ

भांडुपच्या डोंगराळ भागात गांजाची रोपे; ‘ड्रग्स’ शेतीच्या संशयाने खळबळ

Google News Follow

Related

भांडुप पश्चिम येथील डोंगराळ भागातील टेकडी जलाशय परिसरात गांजाची अनेक रोपटे आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या माहितीनंतर भांडुप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि ही रोपे जप्त केली. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असल्याची माहिती परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत यांनी दिली आहे.

भांडुपमधील स्थानिक भाजप नगरसेविका जागृती पाटील यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, भांडुप टेकडी जलाशय परिसरातील डोंगराळ भागात गांजाची लागवड करण्यात आली आहे. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह संबंधित डोंगर परिसर गाठला. तिथे शोध घेतला असता, काही अंतरावर पाणथळ जमिनीवर गांजाची झाडे उगवल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी त्वरित या प्रकाराची माहिती भांडुप पोलिसांना दिली.

भांडुप टेकडीचा हा भाग दुर्गम आणि डोंगराळ असल्याने तिथे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची ये-जा असते. पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, या ठिकाणी गांजा ओढण्यासाठी येणाऱ्या व्यसनी व्यक्तींनी गांजाच्या बिया तिथे टाकल्या असाव्यात. सध्या पावसाळी वातावरण आणि पाणथळ जमीन असल्यामुळे त्या बियांतून ही रोपे नैसर्गिकरित्या उगवली असावीत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

“या परिसरात गांजाची पद्धतशीर शेती करण्यात आलेली नाही. गांजाची काही रोपटे ठराविक अंतरावर नैसर्गिकरित्या उगवल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ही रोपे नष्ट केली आहेत. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नसून तपास सुरू आहे.” – हेमसिंग राजपूत (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ७)

हे ही वाचा:

हाफिज सईदचा निकटवर्तीय दहशतवादी इस्माईल अहमद आढळला मृतावस्थेत

सत्तास्थापनेसाठी DMK-AIADMK ला संधी दिल्यास TVK आमदारांचे राजीनामे?

पाकिस्तानी सैन्याकडून पाच बलुच नागरिकांचे अपहरण

छत्तीसगडमधील नक्षलमुक्त पोलमपल्लीमध्ये कायमस्वरूपी रेशन दुकान सुरू!

पोलिसांनी या मोहिमेदरम्यान परिसरातील सर्व संशयास्पद झाडे उखडून टाकली असून ती ताब्यात घेतली आहेत. या डोंगराळ भागात रात्रीच्या वेळी अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे अड्डे चालतात का? आणि यामागे कोणाचे संगनमत आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा