29.6 C
Mumbai
Tuesday, May 12, 2026
घरक्राईमनामाफरार निदा खानला लपवणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेलविरुद्ध गुन्हा

फरार निदा खानला लपवणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेलविरुद्ध गुन्हा

पोलिसांच्या तपासात उघड, मतीनचा मोबाईल जप्त

Google News Follow

Related

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) या कंपनीमध्ये कॉर्पोरेट जिहाद अर्थात हिंदूंचे धर्मांतरण करण्याचा खेळ सुरू असल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आल्यानंतर त्यातली एक आरोपी असलेली कर्मचारी निदा खानला अटक झाली आहे. मात्र ती गेले अनेक दिवस फरार असताना तिला लपवण्याचे काम एमआयएम या पक्षाचे छत्रपती संभाजीनगरमधील नगरसेवक मतीन पटेल यांनी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे एमआयएम या पक्षाचाही निदा खानशी आणि तिने केलेल्या कृत्यांशी कोणत्या प्रकारचा संबंध आहे, याचाही तपास व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. यासंदर्भात मतीन पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात आता नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस पाठवली असून त्यांचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. गेल्या ४० दिवसांपासून निदा खान फरार होती. तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर तिचा ठावठिकाणा सापडत नव्हता. त्यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले की, निदा खानसारखी एक गर्भवर्ती असलेली स्त्री पोलिसांना गुंगारा कसा काय देऊ शकते? अखेर तिला आता अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भांडुपच्या डोंगराळ भागात गांजाची रोपे; ‘ड्रग्स’ शेतीच्या संशयाने खळबळ

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका- इराणमध्ये गोळीबार

इराणकडून होर्मुझमध्ये चीनच्या जहाजावर हल्ला

निदा खान गेल्या पाच दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. ती नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात होती. तो संपर्क झाल्यावर तिने संभाजीनगरात येण्याचे ठरविले. विशेष म्हणजे मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन फ्लॅट विकत घेतला होता, त्यातच निदा खानला लपविण्यात आले होते.

निदा खान कौसर पार्क येथील मतीन पटेल यांच्या मालकीच्या घरात लपली असल्याची कुणकुण नाशिक पोलिसांना लागल्यावर नाशिक पोलिसांनी संभाजीनगर पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती कळवली. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने सलग दोन दिवस या इमारतीवर पाळत ठेवली. तांत्रिक तपासात खात्री पटताच मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेण्यात आले.

निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते, मात्र न्यायालयाने हे प्रकरण ‘आंतरराष्ट्रीय सिंडिकेट’शी संबंधित असल्याचे सांगत तिचा जामीन फेटाळला. निदाच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, परकीय निधी आणि धर्मांतराचे जाळे यावर प्रकाश पडणार आहे.

दरम्यान, नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांना पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही दोघांवर आहे. तसेच फिर्यादीला दिलेल्या गुंगीकारक पदार्थाचा स्रोत, बँक व्यवहार आणि फंडिंग याबाबतही पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा