30 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरबिजनेसक्रिकेटनंतर ‘टॅक्स पिच’वरही महेंद्रसिंह धोनी अव्वल

क्रिकेटनंतर ‘टॅक्स पिच’वरही महेंद्रसिंह धोनी अव्वल

५० कोटींपेक्षा जास्त अॅडव्हान्स टॅक्स भरत बिहार-झारखंडमध्ये पहिला

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण क्रिकेट नसून आयकर भरणा आहे. बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक आयकर भरणारा करदाता म्हणून महेंद्रसिंह धोनी यांचे नाव समोर आले आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये त्यांनी तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिक अॅडव्हान्स टॅक्स भरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनी यांची कमाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आयपीएलमधील सहभाग, विविध ब्रँड्सच्या जाहिराती, व्यवसाय गुंतवणूक आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमधून त्यांचे उत्पन्न सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच ते बिहार-झारखंडमधील सर्वाधिक कर भरणारे व्यक्ती ठरले आहेत. बिहार-झारखंडचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त डॉ. डी. सुधाकर राव यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.
हे ही वाचा:
फरार निदा खानला लपवणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेलविरुद्ध गुन्हा

भांडुपच्या डोंगराळ भागात गांजाची रोपे; ‘ड्रग्स’ शेतीच्या संशयाने खळबळ

हाफिज सईदचा निकटवर्तीय दहशतवादी इस्माईल अहमद आढळला मृतावस्थेत

परदेशातून विक्रमी १३७ अब्ज डॉलर भारतात
आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांतून आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान सुमारे २० हजार कोटी रुपयांचे करसंकलन झाले आहे. यामध्ये झारखंडचा वाटा सर्वाधिक असून जवळपास १२ हजार कोटी रुपये झारखंडमधून जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, एकूण करसंकलनातील सुमारे ७० टक्के हिस्सा ‘टीडीएस’ (स्त्रोतावर कर कपात) द्वारे जमा झाला आहे.
फक्त वैयक्तिक करदातेच नव्हे, तर मोठ्या सरकारी कंपन्यांनीही करसंकलनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड, भारत कोकिंग कोल लिमिटेड आणि सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर भरला आहे. मुसळधार पावसामुळे खाणकामावर काही प्रमाणात परिणाम झाला असतानाही करसंकलन समाधानकारक राहिल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आयकर विभागाने आणखी एक महत्त्वाची बाब समोर आणली आहे. बिहार आणि झारखंडमध्ये मिळून सुमारे ५.५ कोटी पॅन कार्डधारक आहेत. मात्र यापैकी केवळ ४० लाख नागरिकच नियमित आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरतात. त्यामुळे आयकर विभाग आता जनजागृती मोहीम राबवून अधिकाधिक नागरिकांना करप्रणालीमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा