29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरविशेषबुलेट ट्रेन प्रकल्पाच्या २१ किमी बोगद्यासाठी दुसऱ्या टीबीएमचा कटरहेड बसवला

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या २१ किमी बोगद्यासाठी दुसऱ्या टीबीएमचा कटरहेड बसवला

मुंबई- अहमदाबाद प्रकल्पाने गाठला महत्त्वाचा टप्पा

Google News Follow

देशातील महत्त्वाकांक्षी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबईजवळील सावली (घणसोली) शाफ्ट येथे २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी दुसऱ्या टनेल बोरिंग मशीन (TBM) चा विशाल कटरहेड यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे. सुमारे १३.६ मीटर व्यास आणि जवळपास ३५० टन वजन असलेला हा कटरहेड टीबीएमच्या मुख्य शिल्ड असेंब्लीचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. यामुळे बोगद्याच्या बांधकामाला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही दुसरी टीबीएम सावली (घणसोली) येथून उत्खनन सुरू करून विक्रोळीच्या दिशेने पुढे जाणार आहे. यापूर्वी याच आठवड्यात पहिल्या टीबीएमचा कटरहेड विक्रोळी येथे बसवण्यात आला होता. आता दोन्ही यंत्रांची अंतिम जुळणी (असेंब्ली) आणि कार्यक्षमता चाचण्या (कमीशनिंग ट्रायल्स) घेतल्या जाणार आहेत. प्रकल्पानुसार जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही मशीनद्वारे प्राथमिक उत्खनन सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

१३.६ मीटर व्यासाचा हा कटरहेड विशेषतः एकाच मोठ्या बोगद्याच्या खोदकामासाठी तयार करण्यात आला आहे. या बोगद्यातून हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांची वाहतूक एकाच वेळी चालू शकणार आहे. या अत्याधुनिक यंत्रणेत ८४ कटर डिस्क, १२४ स्क्रॅपर आणि १६ बकेट लिप्स बसवण्यात आले आहेत. ही उपकरणे खडक कापणे आणि मलबा हटविण्याचे काम अत्यंत कार्यक्षमतेने करतात. या प्रकल्पासाठी आतापर्यंत दोन अत्याधुनिक टीबीएम प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी टीबीएम-1 चे वजन ३,०८० टन, तर टीबीएम-2 चे वजन ३,१८४ टन आहे. दोन्ही मशीनचे कटरहेड १३.६ मीटर व्यासाचे असून त्या मिक्स शिल्ड आणि स्लरी-आधारित तंत्रज्ञानावर कार्य करतात.

हे ही वाचा:

बंगालमध्ये ईदची सुट्टी फक्त एका दिवसाची!

दोन्ही पालक IAS अधिकारी असल्यास मुलांना आरक्षण का?

बांद्रा तलाव केला रिकामा, फक्त दोन मृत कासव सापडले

चीनमध्ये कोळसा खाणीत भीषण वायू स्फोट; ८२ कामगारांचा मृत्यू

प्रत्येक टीबीएमची एकूण लांबी ९५.३२ मीटर आहे. या यंत्रांमध्ये कटर व्हील, मुख्य बेअरिंग, जॉ क्रशर, इरेक्टर, मेन शिल्ड, टेल शिल्ड आणि बोगदा बांधकामासाठी आवश्यक चार विशेष गॅन्ट्री यांसारखी आधुनिक उपकरणे समाविष्ट आहेत. या मशीन चार आरपीएमपर्यंत कटरहेड गती आणि प्रतिमिनिट ४९ मिमीपर्यंत उत्खनन क्षमता राखून कार्य करू शकतात. त्यामुळे बोगद्याचे बांधकाम अधिक सुरक्षित, नियंत्रित आणि सातत्यपूर्ण गतीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशातील सर्वात मोठ्या हाय-स्पीड रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातो. टीबीएमच्या या टप्प्याला प्रकल्पाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणून पाहिले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा