31.2 C
Mumbai
Tuesday, June 9, 2026
घरबिजनेसअर्जेंटिनाच्या पहिल्या एलएनजी निर्यात प्रकल्पात भारताचा सहभाग; काय आहे करार?

अर्जेंटिनाच्या पहिल्या एलएनजी निर्यात प्रकल्पात भारताचा सहभाग; काय आहे करार?

१० वर्षांच्या सागरी सेवा कराराला मंजुरी

Google News Follow

Related

अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) ला अर्जेंटिनाच्या पहिल्या द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) निर्यात प्रकल्पासाठी १० वर्षांचा सागरी सेवा करार मिळाला आहे. या यशामुळे कंपनीने दक्षिण अमेरिकेतील बाजारपेठेत प्रवेश केला असून आंतरराष्ट्रीय सागरी सेवा क्षेत्रातील आपली उपस्थिती अधिक मजबूत केली आहे. तसेच, भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील वाढत्या ऊर्जा सहकार्यालाही यामुळे चालना मिळणार आहे.

भारताची सर्वात मोठी एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक कंपनी असलेल्या अदाणी पोर्ट्सने सांगितले की, हा करार तिच्या स्टेप-डाउन उपकंपनी अदाणी हार्बर इंटरनॅशनल FZCO ला अर्जेंटिनाच्या मेरिडियन ग्रुप सोबत स्थापन केलेल्या संयुक्त कन्सोर्टियममार्फत मिळाला आहे. हा करार सदर्न एनर्जी एसए यांनी आयोजित केलेल्या जागतिक स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेनंतर मंजूर करण्यात आला. अदाणी समूह आणि मेरिडियन ग्रुपचे हे कन्सोर्टियम सदर्न एनर्जी FLNG (Floating Liquefied Natural Gas) प्रकल्पासाठी सागरी सेवा पुरवणार आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे ७ कोटी डॉलर्स (70 मिलियन डॉलर) गुंतवणुकीची तरतूद आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २.४५ दशलक्ष टन (एमटी) एलएनजी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे, जे सुमारे २८ एलएनजी कार्गो जहाजांइतके असेल. यामुळे हा प्रकल्प अर्जेंटिनाचा पहिला कार्यरत एलएनजी निर्यात प्रकल्प ठरणार आहे. APSEZ चे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अश्विनी गुप्ता यांनी सांगितले की, “हा प्रकल्प जगभरातील मोठ्या ऊर्जा पायाभूत सुविधा प्रकल्पांना पाठबळ देण्याच्या आमच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे.” ते पुढे म्हणाले की, कंपनी सध्या १२ देशांमध्ये सागरी सेवा संचालन करत असून बंदरे, एलएनजी टर्मिनल्स, राष्ट्रीय तेल कंपन्या, रिफायनऱ्या आणि ऑफशोअर सुविधांना सहाय्य करणाऱ्या सागरी संसाधनांचे मजबूत जाळे तिच्याकडे आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या सागरी वातावरणात काम करण्याचा मोठा अनुभव कंपनीला मिळाला आहे.

स्थानिक भागीदारांच्या सहकार्याने कंपनी विश्वासार्ह सागरी पायाभूत व्यवस्था उभारण्यास मदत करत असून यामुळे नवीन ऊर्जा व्यापार मार्ग निर्माण होतील आणि दीर्घकालीन ऊर्जा पुरवठा सुरक्षितता अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी नमूद केले. या करारानुसार कन्सोर्टियम एलएनजी वाहतूक करणाऱ्या जहाजांसाठी टगबोट सेवा, ऑफशोअर लॉजिस्टिक्स, पुरवठा सहाय्य आणि कर्मचारी वाहतूक (क्रू ट्रान्सफर) सेवा यांसह संपूर्ण सागरी सेवा उपलब्ध करून देणार आहे.

हे ही वाचा:

अमली पदार्थ तस्करीशी संबंधित चार कोटींची मालमत्ता जप्त

होर्मुझ सामुद्रधुनीत ओमानजवळ २४ भारतीयांना घेऊन जाणाऱ्या टँकरवर हल्ला

भारत-अमेरिका संरक्षण संबंध बळकटीकरण; आर्मी-टू-आर्मी स्टाफ चर्चा

सोरेनना सोडणार नाही! न्यायालयाने याचिका फेटाळली

अर्जेंटिना वेगाने एक महत्त्वाचा एलएनजी पुरवठादार देश म्हणून उदयास येत असून, २०२७ पासून भारताला दरवर्षी १ कोटी टन एलएनजी निर्यात करण्याचे करार त्याने केले आहेत. सदर्न एनर्जीचा FLNG प्रकल्प अर्जेंटिनाच्या वाढत्या एलएनजी पुरवठ्याला जागतिक बाजारपेठांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी चार अत्याधुनिक टगबोट्स, एक अँकर हँडलिंग टग सप्लाय व्हेसल आणि एक क्रू बोट तैनात केली जाणार असून, यामुळे सागरी सेवा सुरळीतपणे पार पाडता येतील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
312,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा