30.9 C
Mumbai
Monday, June 15, 2026
घरसंपादकीयढोंग्याला शुभेच्छा नाहीत...

ढोंग्याला शुभेच्छा नाहीत…

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस काल १४ जून रोजी ८० वा वाढदिवस होता. तो वाजतगाजत साजरा करण्याचा त्यांचा इरादा होता. इराणशी शांतता करार झालाय, असे जाहीर करून ट्रम्प यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. जगातील नेते कौतुक करतील अशी अपेक्षा होती. परंतु अपेक्षाभंग झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना एक्सवर एका ओळीच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. तुम्ही ‘वाकड्यात जाणार आणि आम्ही आरत्या ओवाळणार, हे शक्य नाही, असा स्पष्ट संकेत मोदींनी दिला आहे.

ट्रम्प यांनी वाकड्यात जाण्याचा सिलसिला सुरू ठेवला आहे. भारत-अमेरिका संबंधांचा कडेलोट करूनच ट्रम्प थांबतील असे दिसते आहे. भारताने याप्रकरणी सबुरीची भूमिका घेतली आहे. संबंध जपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु वाकड्यात गेल्याशिवाय ट्रम्प यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, असेच चित्र दिसते आहे.

‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मध्ये भारतीय खलाशी असलेल्या तीन जहाजांना आतापर्यंत अमेरिकी नौदलाने लक्ष्य केले आहे. तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिया यांना फोन करून या घटनांबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली, परंतु रुबियो यांनी भारताला धमकावण्याचा प्रय़त्न केला. ‘अमेरिकेने लावलेल्या ब्लॉकेडचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल’, असे डॉ.जयशंकर यांना सुनावले.

भारताने अमेरिकेच्या दटावणीनंतरही रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवली. मे महिन्यात रशियाकडून ६.७ अब्ज डॉलर किमतीचे रशियन तेल भारताने खरेदी केले. रशियन तेल खरेदीबाबत चीननंतर भारत दुसऱ्या  क्रमांकावर येतो. अमेरिकेला खटकत असूनही भारताने तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे ट्रम्प वैतागले आहेत. रशियन तेल ही ट्रम्प यांच्यासाठी दुखरी रग बनली आहे. त्यामुळेच जमेल तेव्हा ते भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. एआयच्या क्षेत्रात सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या अँथ्रोपिक या कंपनीवर ट्रम्प यांनी अलिकडेच निर्बंध लादले.

ट्रम्प प्रशासनाने अँथ्रोपिकच्या मायथोस -५ आणि फेबल – ५ या दोन अत्यंत प्रगत मॉडेल्सच्या निर्यातीवर अचानक बंदी घातली आहे. अमेरिकी नागरीक वगळता कोणालाही ही मॉडेल्स विकण्याची ही बंदी आहे. या निर्णयामुळे भारताच्या टेक जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

शरद पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद चितपट

भारत-स्लोव्हाकिया संबंधांना ‘व्यापक भागीदारी’चा दर्जा!

दिव्यांशी सिंग बनणार भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला कमिशन्ड अधिकारी

विमानतळावर रोखले अन्‌ बांगलादेशी पंतप्रधानांच्या सल्लागारांनी अर्धवट सोडला भारत दौरा

या वादाची सुरुवात अमेरिका सरकार (पेंटागॉन) आणि अँथ्रोपिक कंपनी यांच्यातील मतभेदांमुळे झाली. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाला अँथ्रोपिकच्या AI तंत्रज्ञानाचा वापर युद्धासाठी, क्षेपणास्त्र डागण्याचे निर्णय घेण्यासाठी आणि गर्दीतून मानवी चेहरे ओळखण्यासाठी करायचा होता. परंतु, अँथ्रोपिकने त्यांच्या एआय सुरक्षा नियमांचे आणि नैतिकतेचे कारण पुढे करत नकार दिला. तेव्हापासून ट्रम्प संतप्त झाले आहेत. अँथ्रोपिकला धक्क्याला लावण्याचे प्रय़त्न करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत अँथ्रोपिकच्या सर्वात प्रगत मॉडेल्सच्या परदेशी वापरावर त्यांनी बंदी आणली असून अँथ्रोपिकला पहीला झटका दिला आहे.

फेबेल ५ हे मॉडेल कोडिंगचे विश्लेषण करणे, सॉफ्टवेअरमधील त्रुटी किंवा बग्स शोधणे आणि सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी अत्यंत प्रगत मानले जाते. मिथोस ५ हे मॉडेलचा वापर जटिल प्रणालींचे विश्लेषण आणि सुरक्षा यंत्रणांमधील संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी केला जात होता. ट्रम्प यांनी अँथ्रोपिकवर कारवाई करून एका दगडात दोन पक्षी मारले. एका बाजूला अँथ्रोपिकला झटका दिला, दुसऱ्या बाजूला भारताचेही नुकसान केले. भारत हा अँथ्रोपिकची दुसरी मोठी बाजारपेठ आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या ५० हजार कर्मचाऱ्यांना हे तंत्रज्ञान देण्यासाठी अँथ्रोपिकसोबत करार केला होता. इन्फोसिसनेही एआय सोल्यूशन्ससाठी भागीदारी केली होती. ट्रम्प यांनी घातलेल्या बंदीमुळे या ९० तासांत खंडीत करण्यात आल्या. भारताच्या सायबर सुरक्षा विभागातील ‘प्रोजेक्ट ग्लासविंग’अंतर्गत काही सरकारी संस्था आणि खाजगी संस्थांना ‘मिथोस’ मॉडेल वापरण्याची मर्यादित परवानगी होती, ज्यावर आता बंदी आली आहे.

ट्रम्प यांच्यासाठी त्यांचा अहंकार सर्व श्रेष्ठ आहे. अंहकार दुखावला तर ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. ते कोणाचाही कडेलोट करू शकतात. भारताने रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावर नमते घेतले नाही, याची ट्रम्प यांना जबरदस्त सल आहे. त्यामुळे ते शक्य असेल तेव्हा भारताचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात.

अमेरिका भारतापासून इतका दूर आहे की भारताला अमेरिकेच्या किंवा अमेरिकाला भारताच्या वाकड्यात जाण्याचे कारण नाही. भारताची तशी इच्छा नाही. परंतु ट्रम्प यांची तशी इच्छा आहे. अमेरिकेशी संबंध भारताच्या व्यापारी आणि सामरीक हिताचे आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन मोदी यांनी ट्रम्प यांच्या आचरटपणाकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण ठेवले. मोदींनी आतापर्यंत ट्रम्प यांच्यावर कधीही थेट टीका केली नाही. याचा अर्थ ट्रम्प यांची करणी मोदी विसरले असे होत नाही.

राष्ट्राध्यक्षपदी ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर सुरुवातीचा फार थोडा काळ ट्रम्प आणि मोदी यांचे संबंध मधुर होते. परंत ऑपरेशन सिंदूरनंतर हे संबंध बिघडायला सुरूवात झाली. ट्रम्प यांनी नख काढली. सुरूवातीला एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मोदी ट्रम्प यांचा उल्लेख ‘माय फ्रेंड ट्रम्प’ असा करायचे. त्यानंतर त्यांनी माय फ्रेंड हा शब्द वगळला. आता तर वाढदिवसाच्या दिवशी ट्रम्प यांना शुभेच्छा न देऊन मोदींनी ट्रम्प यांना फाट्यावर मारले आहे.

भारत आणि अमेरिकेत सगळे काही आलबेल नाही, हे मोदींनी आपल्या कृतीतून स्पष्ट केले आहे. त्या आधी परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर यांनी हेलसिंकी येथे झालेल्या कुल्तारांता टॉक्समध्ये ट्रम्प यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती.

अमेरिकी नेते कायम महासत्ता असल्याचा माज दाखवत असतात. त्यांच्या शारीर भाषेतून तो व्यक्त होत असतो. ट्रम्प यांनी माजाच्या प्रांतातील आधीचे सगळे विक्रम मोडले आहेत. व्यापारी जहाजांवर केलेल्या हल्ल्यात भारतीय प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतरही ट्रम्प यांनी साधी हळहळ व्यक्त केली नाही. अमेरिकी नागरिकाच्या जीवालाच महत्त्व असते, बाकी जगातील नागरीक जगले मेले त्यांना काहीच फरक पडत नाही. ही अमेरिकेची प्रवृत्ती आहे. ट्रम्प यांची मानसिकता वेगळी नाही.

भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्यानंतरही मोदींवर प्रचंड टीका झाली. ती योग्यही होती. देशात जर काही चांगले घडत असेल तर त्याचे श्रेय मोदींना मिळते. त्याच प्रमाणे जर काही चुकीचे झाले तर त्यांच्यावर टीकाही झालीच पाहिजे. थंड करून खाणे ही मोदींची कार्यशैली आहे. मारीयो पुझोच्या गॉडफादर या कादंबरीत सूडाबाबत  छान वाक्य आहे. ‘Revenge is a dish that tastes best when it is cold’

२०१० मध्ये दहशतवादी सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणी गुजरातचे गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआयने अटक केली होती. लक्ष्य होते मोदी. अमित शहा यांनी सोनियांच्या इच्छेप्रमाणे मोदीविरोधी जबाब दिला असता, तर मोदीही तुरुंगात गेले असते. आज २०२६ मध्ये सोनिया गांधी यांची काय परिस्थिती आहे पाहा. १२ वर्षे सत्तेतून हद्दपार आहेत. भविष्यात कधी सत्तेवर येतील याची शक्यता नाही.

ऑपरेशन सिंदूरनंतर ट्रम्प यांनी मोदींना अनेकदा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या हाती कोलीत मिळेल अशी वक्तव्य केली. परंतु मोदी एका शब्दाने बोलले नाहीत. ते बोलत नाहीत. परंतु ते माफ करत नाहीत. ते करून दाखवतात. मोदींचा अपमान करणाऱ्यांची देशाच्या राजकारणात काय अवस्था होते हे सोनिया ते केजरीवाल यांच्या उदाहरणावरून लक्षात येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर जस्टीन ट्रुडोची काय अवस्था आहे, पाकिस्तानची त्यांना काय अवस्था केली. ते ट्रम्प यांना मोदी त्यांच्या सत्ताकाळात झटका देणार हे निश्चित. तो कधी एवढाच प्रश्न आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा