29.1 C
Mumbai
Monday, June 22, 2026
घरस्पोर्ट्सस्फोटक फलंदाजीचे दुसरे नाव वैभव सूर्यवंशी, ११ चेंडूंत अर्धशतक

स्फोटक फलंदाजीचे दुसरे नाव वैभव सूर्यवंशी, ११ चेंडूंत अर्धशतक

१५ व्या वर्षीच मोडले अनेक मोठे विक्रम, श्रीलंका अ विरुद्धचा सामना

Google News Follow

Related

अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी एकामागून एक विक्रम मोडत आहे. श्रीलंका अ विरुद्ध वैभवने फक्त ११ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत लिस्ट ए क्रिकेटमध्ये जागतिक विक्रम केला. तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. वैभवने या सामन्यात ९४ धावांची खेळी केली. मात्र त्याचे शतक ६ धावांनी हुकले. पण या स्फोटक खेळीत त्याने १० चौकार आणि ८ षटकारांसह सगळ्यांना खुश केले.

वैभवने हे विक्रम नोंदविले आहेत.

सर्वात वेगवान अर्धशतक:

भारत अ कडून खेळताना श्रीलंका अ विरुद्ध वैभव सूर्यवंशीने फक्त ११ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये वैभव आता सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज बनला आहे. वैभवने श्रीलंकेच्या कौशल्या वीररत्ने यांचा विक्रम मोडला, ज्यांनी १२ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते.

सर्वात कमी वयात शतक :

वैभव सूर्यवंशी हा लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज आहे. त्याने १४  वर्षे २७२ या वयात शतक झळकावत हा विक्रम आपल्या नावावर केला. बिहारकडून खेळताना विजय हजारे ट्रॉफीत त्याने ही कामगिरी केली होती. या सामन्यात वैभवने १९० धावांची दमदार खेळी केली होती.

सर्वात वेगवान १५० धावा:

वैभव सूर्यवंशी हा जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १५० धावा करणारा फलंदाज आहे. विजय हजारे ट्रॉफीत अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने एबी डीव्हिलियर्स यांचा विक्रम मोडला होता. वैभवने फक्त ५९ चेंडूंमध्ये १५०  धावा पूर्ण केल्या होत्या.

हे ही वाचा:

NEETच्या तणावाची आणखी एक बळी

होणार तीर्थक्षेत्रांचा कायापालट, मिळणार संस्कृतीला नवी ओळख

भारतीय नौदलात तीन अत्याधुनिक स्वदेशी युद्धनौकांचा समावेश

पुन्हा एकदा होर्मुझला टाळे…इराणने केला दावा

तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक:

या १५ वर्षीय फलंदाजाच्या नावावर लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम आहे. वैभवने विजय हजारे स्पर्धेत बिहारकडून खेळताना फक्त ३६ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये वैभवपेक्षा वेगवान शतके इशान किशन (३३ चेंडू) आणि अनमोलप्रीत सिंग (३५ चेंडू) यांनी केली आहेत.

युवा कसोटीत सर्वात वेगवान शतक:

वैभव सूर्यवंशीच्या नावावर भारताकडून युवा कसोटीत सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम आहे. भारत अंडर-१९ संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्ध त्याने फक्त ५८ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. हे अंडर-१९ क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतकही आहे.

रणजीत पदार्पण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण खेळाडू:

वैभव सूर्यवंशी हा रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात पदार्पण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने १२ वर्षे २८४ दिवसांच्या वयात या स्पर्धेत पदार्पण केले होते.

टी-20 मध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज:

वैभव सूर्यवंशी हा टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज आहे. त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्स विरुद्ध शतक झळकावले होते. वैभवने ३८ चेंडूंमध्ये १०१ धावांची शानदार खेळी केली होती. आयपीएल २०२६  मध्ये वैभवने एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेल यांचा विक्रमही मोडला. त्याने एका हंगामात ७२ षटकार ठोकले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा