26.6 C
Mumbai
Saturday, July 4, 2026
घरक्राईमनामाहायटेक पद्धतीने फॉर्च्युनर चोरणारे आंतरराज्यीय रॅकेट उघड

हायटेक पद्धतीने फॉर्च्युनर चोरणारे आंतरराज्यीय रॅकेट उघड

राजकोटमधून दोघांना अटक, ४५ लाखांची कार जप्त

Google News Follow

Related

खार परिसरातील टोयोटा शोरूममधून हायटेक पद्धतीने ४५ लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर कार चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय वाहनचोरांच्या टोळीचा खार पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत पर्दाफाश केला. गुजरातमधील राजकोट येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली फॉर्च्युनर, ब्लूटूथ कार स्कॅनर आणि दोन अॅपल मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दीप रमणीकभाई आघेर (२८) आणि राहुल भरतभाई घीयाल (२९, दोघेही रा. राजकोट, गुजरात) अशी आहेत. दीपविरुद्ध विविध राज्यांत किमान पाच गुन्हे दाखल असून राहुल हा गुजरातमधील अन्य वाहनचोरीच्या गुन्ह्यातही वाँटेड असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

खार येथील एस. व्ही. रोडवरील टोयोटा शोरूममध्ये ग्राहकांच्या टेस्ट ड्राइव्हसाठी वापरली जाणारी फॉर्च्युनर २४ जूनच्या रात्री पार्क करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वाहन जागेवर आढळून न आल्याने खार पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासात आरोपींनी अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने वाहनाच्या चावीचे सिग्नल क्लोन करून कार चोरी केल्याचे निष्पन्न झाले. चोरीनंतर वाहनावर बनावट क्रमांक प्लेट लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, वाहनावरील विशिष्ट खुणांमुळे त्याची ओळख पटली.

हे ही वाचा:

“काश्मिरींना बंदुका पाक लष्कराने दिल्या आणि आता दहशतवादी म्हणतात”

मोजतबा खामेनी वडिलांच्या अंत्यविधीला राहणार गैरहजर

भारत-जपानमध्ये संयुक्त संरक्षण सह-विकास प्रकल्प करार

ऑस्ट्रियातील भारताच्या राजदूतांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या पंचतंत्राच्या कथा

तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचे लोकेशन राजकोट येथे मिळाल्यानंतर खार पोलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचून दोघांना अटक केली. चौकशीत आरोपींनी चोरीची फॉर्च्युनर नवसारी जिल्ह्यातील चिखलीजवळील बिलिमोरा रोड परिसरात लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी वाहन हस्तगत केले.

तपासादरम्यान एका आरोपीने वाहनांच्या इलेक्ट्रॉनिक सुरक्षा प्रणालीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी विशेष कोडिंग व उपकरणांचा वापर केल्याचे, तर दुसरा आरोपी नंबर प्लेट बदलणे, सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय करणे आणि चेसिसमध्ये छेडछाड करण्यात निष्णात असल्याचे उघड झाले. या कारवाईमुळे आंतरराज्य स्तरावर कार्यरत असलेल्या हायटेक वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपींना न्यायालयाने ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा