28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषबापरे! एका महिलेला दिले चक्क लसीचे तीन डोस

बापरे! एका महिलेला दिले चक्क लसीचे तीन डोस

Google News Follow

ठाण्यातून एक अजब गजब प्रकार आता समोर आलेला आहे. एका महिलेला चक्क लसीचे तीन डोस देण्याचे वृत्त समोर आले आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर हा भयानक प्रकार घडलेला आहे. महापालिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्रावर झालेला हा प्रकार आता सर्वच ठिकाणी चर्चेचे केंद्रबिंदू ठरलेला आहे. २८ वर्षीय महिलेला एकाच वेळी तीन डोस देण्यात आलेले आहे. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे, परंतु पालिकेच्या या कारभाराला काय म्हणावे असाच प्रश्न आता सर्वच स्तरातून उमटू लागलेला आहे. अशा निष्काळजीपणाला जबाबदार असणारे जे कोणी आहेत त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता भाजपने केलेली आहे. पालिकेने आम्ही चौकशी करत असल्याचे सांगून सध्या तरी वेळ मारून नेलेली आहे.

हे ही वाचा:

गणपती बाप्पा मोरया! नियमांचे पालन करुया!!

महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय

ईडीने मागितल्या देशमुखांकडे ‘या’ पाच गोष्टी

स्वित्झर्लंडने फ्रान्सला दाखवला बाहेरचा रस्ता

लस घेण्याकरता ब्रम्हांड येथील महिला दुपारी घोडबंदर केंद्रावर गेल्यानंतर हा प्रकार घडला. आरोग्य केंद्रावर उपस्थित असणारा कर्मचाऱ्याने यावेळी महिलेला तब्बल तीन डोस दिले. ती महिला घाबरून घरी आली आणि तिने घडलेला प्रकार पतीला सांगितला. यासंदर्भात अनेकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. खासकरून ठाणे महापालिकेकडून अतिशय उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले.

एकीकडे सर्वसामान्य एका लसीसाठी भटकत आहेत, तिथे ठाण्यात झालेला हा प्रकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. तब्बल दहा मिनिटांच्या अंतराने तीन लसीचे डोस देण्यात आले. ठाणे पालिका आयुक्तांनी घडलेल्या घटनेबद्दल बोलण्यास नकार दिला. भाजपच्या नगरसेविका कविता पाटील म्हणाल्या की, माझ्यासोबत असे घडले आहे हे महिलेने मला सांगितले. हा प्रकार अतिशय धोकादायक आहे. लोकांच्या आरोग्याशी हा खेळ आहे. त्यांचा फोन आल्यावर आधी तिचे आरोग्य धोक्यात नाही ना याकडे आम्ही लक्ष दिले. लस दिली हे कुणालाच माहीत नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी तेथील डॉ. मुंदरा यांनी तीनदा लस दिली गेल्याचे कबुल केले.

सद्यस्थितीला या महिलेची परिस्थिती उत्तम असल्याचेही भाजपच्या नगरसेविका यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा