28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरधर्म संस्कृतीगणपती बाप्पा मोरया! नियमांचे पालन करुया!!

गणपती बाप्पा मोरया! नियमांचे पालन करुया!!

Related

गणेशोत्सवासाठी जवळपास दोन महिने शिल्लक असताना आता राज्य सरकारने नवी मार्गदर्शक तत्त्वे गणेशोत्सवासाठी आखून दिली आहेत, मात्र त्यातून मोठ्या मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांचे समाधान होणारे नाही. त्यामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ४ फुटाच्या मूर्तीची तर घरगुती गणेशोत्सव मंडळांनी २ फुटाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद करण्यात आले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे तातडीने जाहीर करावी अशी मागणी गणेश मूर्तिकारांकडून केली जात होती. ही मार्गदर्शक तत्त्वे अखेर सरकारने मंगळवारी जाहीर केली.

हे ही वाचा:

महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय

ईडीने मागितल्या देशमुखांकडे ‘या’ पाच गोष्टी

मॉडर्ना ठरणार भारतातील चौथी कोरोना लस

उत्तर प्रदेशच्या धर्मांतराचे ‘कनेक्शन’ बीडपर्यंत

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे राज्य सरकारने म्हटले असून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांना स्थानिक प्रशासनाकडून योग्य परवानगी घेणे आवश्यक असेल. गणपतीचे दर्शन प्रत्यक्ष मंडपात जाऊन घेता येणार नाही.  ऑनलाइन दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी लागेल. या मूर्त्याही शाडुच्या मातीच्या असाव्यात अशी मार्गदर्शक सूचना आहे. अर्थात, यामुळे मूर्तिकारांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो, कारण बहुसंख्य मूर्तिकार हे घरगुती गणपती किंवा सार्वजनिक गणपतींसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचाच वापर करतात.

आरती, भजन यासाठी होणारी गर्दी टाळावी, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे राबवावी, श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये, विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे, लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांनी विसर्जन स्थळी जाऊ नये तसेच गणपती मंडळाने निर्जंतुकीकरणाची, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी अशाही सूचना यात करण्यात आल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा