31 C
Mumbai
Monday, September 21, 2026
घरसंपादकीयशुभेंदू योग्य तेच म्हणाले, हा कचराच आहे, साफ करायलाच हवा!

शुभेंदू योग्य तेच म्हणाले, हा कचराच आहे, साफ करायलाच हवा!

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी काही दिवसांपूर्वी जादवपूर युनिव्हर्सिटीत गेले होते. कार्यक्रम होता सामूहिक वंदे मातरम् गायनाचा. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत काही काळापूर्वी सुरू असलेले तुकडे तुकडे गँगचे आझादीवाले सर्व तमाशे इथेही चालत असतात. युनिव्हर्सिटीच्या भिंतींवर आझादीच्या घोषणा लिहिल्या होत्या. अशा घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेंदु यांनी चांगलेच फैलावर घेतले. ‘मी कचरा साफ करणारा माणूस आहे, हा कचरा मी स्वच्छ करणार’, असे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत, हातचे काहीही राखून न ठेवता सांगितले. कचरासफाईची ही मोहीम देशभरात हाती घेण्याची गरज आहे.

त्यापूर्वी हा कचरा म्हणजे नेमके काय? हे लक्षात घेण्याची गरज आहे. कॉकरोच आंदोलनात शिवराळ भाषेमुळे देशभरात बदनाम झालेल्या रुचिका सिंग या विद्यार्थिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पुन्हा गरळ ओकली आहे. कचरा सफाईची मोहीम देशभरात किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. शुभेंदु आझादीच्या घोषणा देणाऱ्या, बेताल वागणाऱ्या, देशविरोधी मानसिकता असलेल्या विद्यार्थ्यांना कचरा म्हणालेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. ही मानसिकता कोण्या एका राज्यापुरती मर्यादित नाही. देशभरात ती आपल्याला पाहायला मिळते. ती मर्यादित आहे, परंतु धोकादायक आहे.

देशात रील्स करून पोट भरणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यात काही गैर नाही. अन्य व्यवसायांसारखा हाही एक व्यवसाय आहे. हे रील बनवताना सामाजिक हित, राष्ट्रहित नजरेआड करू नये, तारतम्य बाळगावे अशा किमान अपेक्षा असतात. किमान कपडे वापरून, अश्लील कंटेंट देऊन आणि औकात नसताना एखाद्या बड्या व्यक्तीच्या विरोधात बरळून व्ह्यूज वाढवण्याचे प्रताप काही मंडळी करत असतात. रुचिका सिंग ही त्यातलीच एक. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अभद्र शिवीगाळ केली. लोक चिडले आहेत, प्रकरण अंगाशी येऊ शकते, शेकू शकते हे लक्षात आल्यानंतर ती माफी मागून मोकळी झाली.

काही दिवस बया शांत होती. पुन्हा कोणीतरी चाव्या भरल्यानंतर मोदींच्या विरोधात तिने ताजा व्हिडिओ टाकला आहे. ‘माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. मी आता शांत राहणार नाही’, असे ती म्हणते आहे. ‘लोक मला शिव्या घालतात, कुठे जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही, कोणाला तोंड दाखवू शकत नाही’, याचे खापर ती मोदींच्या डोक्यावर फोडते आहे. देशाच्या सर्वोच्च लोकप्रिय नेत्याने मोठ्या मनाने तिला माफ केले. पण देशाची जनता तिची कर्मे कशी विसरेल? लोक शिव्या घालणारच.

तिचा ताजा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी शेअर केला आहे. यांची परिस्थितीही रुचिकासारखी आहे. त्यांच्याकडेही गमावण्यासारखे काही उरलेले नाही. अगदी लाजही नाही. पंजाबमध्ये कारभार आटोपला की, केजरीवाल आणि अन्य नेत्यांना रुचिकासोबत रील बनवावे लागणार आहेत. पंजाबमध्ये परिस्थिती भयंकर आहे. एका दिवसात तिथे आम आदमी पार्टीच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि दुसरी घटना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर हिला हात बांधून जाळून मारण्यात आले. कायदा-सुव्यवस्थेचा कडेलोट झाला आहे. त्याबद्दल अवाक्षर न बोलता, ‘आप’चे कोडगे रुचिकाचा व्हिडिओ शेअर करतायत.

हे ही वाचा:

घरातल्या निवडणुकीत जिंकता येत नाही, त्यांना पंतप्रधानांची उठाठेव!

यूएस ओपनच्या पहिल्याच फेरीत जोकोविचचा धक्कादायक पराभव!

पाकमध्ये जैशच्या हाफिज जुल्फिकारची गोळ्या झाडून हत्या

भारताविरुद्ध मालिकेसाठी बांगलादेश उत्सुक

जादवपूर युनिव्हर्सिटीत शुभेंदु जे बोलले ते वाया गेलेल्या विद्यार्थ्यांबाबत बोलले. शुभेंदु, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशविरोधात बोलणाऱ्या कोणाबाबत बोलताना भीडभाड ठेवत नाहीत. कमी वयाचे दिवटे असले म्हणून काय, त्यांना देशविरोधी बोलण्याचा परवाना मिळतो? ताळतंत्र सोडून बोलणाऱ्यांना शुभेंदु कचरा म्हणतात. ते जादवपूर युनिव्हर्सिटीत गेले तेव्हा त्यांनी सवाल केला, तुम्हाला हेरॉईन, गांजा फुंकण्याची आझादी हवी आहे का?

तुम्हाला तुकडे तुकडे गँगची आझादी हवी आहे का? काश्मीरची आझादी हवी आहे का? तुम्हाला कोणापासून आझादी हवी आहे? सगळे प्रश्न रोखठोक, कुठेही आडपडदा नाही. ही घोषणाबाजी म्हणजे निव्वळ असंस्कृतपणा आहे. हे मी सहन करणार नाही. एक तर ते तरी राहतील किंवा मी तरी राहीन, असे शुभेंदु यांनी ठणकावून सांगितले. शुभेंदु यांना ठाऊक नव्हते का की, ते हा इशारा विद्यार्थ्यांना देतायत, तथाकथित जेन-झीला देत आहेत. वय कोणतेही असले तरी जो देशाच्या विरोधात बोलतो, त्याची औकात कचऱ्याचीच. वय कमी आहे म्हणून कोणाला वावगे बोलण्या-वागण्याचा अधिकार मिळत नाही.

काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाची पत्रकार परिषद झाली. सहा वर्षांचा मुलगा जे पाहिले, ऐकले त्याबद्दल बोलू शकतो, परंतु त्याच्याकडे इतके शहाणपण निश्चित नसते की, मीडियावाल्यांनी बूम धरून त्याच्यासमोर गर्दी करावी. समस्या अशी आहे की, मीडियाचे बौद्धिक वय देखील ६ च्या आसपासचे आहे. काय दाखवावे आणि काय नाही, याचे त्यांनाही भान नाही. अश्लील चाळे दाखवून व्ह्यूज मिळवणारे रील स्टार आणि मीडियात फारसा फरक उरलेला नाही. सगळेच टीआरपीसाठी सुरू आहे. देशात ब्रिक्स परिषद होऊ घातली आहे. भारताकडे या परिषदेचे यजमानपद आहे. भारताचे पंतप्रधान जिथे जिथे जातात तिथे त्यांना त्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला जातो. जग त्यांच्यासमोर आदराने झुकते आहे, असे वारंवार चित्र दिसते आहे. यामुळे अनेकांच्या पोटात मुरडा उठतो. जनतेने सतत नाकारलेले लोक, मोदींना देशात अजिबात किंमत नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी नागडे होण्याचीही त्यांची तयारी आहे.

भारत मंडपममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय एआय समिटच्या काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशाच नग्न घोषणा दिल्या होत्या. राहुल गांधी यांनी या नागड्यांचे कौतुक केले होते. कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतर येथे केलेल्या आंदोलनानंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ते मागे घेण्यात आले नाहीत, तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा अभिजित दिपके आणि त्याच्या टोळीने दिला आहे. कधीकाळी आम आदमी पार्टीसाठी सोशल मीडियावर ‘ता ता थय्या’ करणारे हे सगळे आपिये आता कॉकरोच जनता पार्टीचा नवा मुखवटा धारण करून जनतेसमोर आले आहेत. दिल्लीत पुन्हा आंदोलन करून ब्रिक्स परिषदेच्या तोंडावर देशाला अपशकून करण्याचा यांचा प्रयत्न आहे.

 

भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय अभ्यागतांसमोर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड काळे करण्याची इच्छा आहे. ते करताना देशाचे तोंड काळवंडले तरी त्याला त्यांची हरकत नाही. नेमके तेच टायमिंग साधून रुचिकाने पुन्हा एकदा शेण खाल्ले आहे. अपात्री दान देऊ नये तशी क्षमाही करू नये. रुचिकाचे वय पाहून तिला दुसरी संधी देण्यात आली. परंतु प्रसिद्धीची नशा होतीच, त्यात बहुधा पाकिटाचे वजनही पडले आहे. त्यामुळे ती पुन्हा बरळली आहे. कमी वयाचे लोक गंभीर अपराध करत नाहीत, अशातला भाग नाही. ठेचून हत्या करण्यापासून सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांत अल्पवयीन आरोपी सापडले आहेत. कमी वयामुळे त्यांनातुरुंगात पाठवत नाहीत. त्यांच्यासाठी बालसुधारगृह असते. तिथे तुरुंगापेक्षा वाईट परिस्थिती असते. शक्ती मिलमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी हा अल्पवयीन होता. रुचिका सिंग तिचे वय १५ असल्याचे सांगते. ती खरे बोलते आहे का, याची खातरजमा करा. वय खरोखरच कमी असेल तर तिला बालसुधारगृहात पाठवून द्या.

रुचिका जे काही बोलली आहे, त्याचे दोन अर्थ निघतात. एक तर तिच्या आई-वडिलांचे तिच्यावर नियंत्रण नाही किंवा तिला पुढे करून आई-वडील पाकिटे जमवण्याच्या कामाला लागले आहेत. शुभेंदु याच मानसिकतेला कचरा म्हणतात.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा