27 C
Mumbai
Tuesday, September 22, 2026
घरदेश दुनियाइराण युद्धामुळे अमेरिकेच्या क्षेपणास्त्र साठ्यात खडखडाट

इराण युद्धामुळे अमेरिकेच्या क्षेपणास्त्र साठ्यात खडखडाट

चीन-रशियाच्या धोक्याची चिंता

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

इराणविरोधातील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाचा अमेरिकेच्या क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण क्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकन लष्कराने या काळात मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रं आणि हवाई संरक्षणासाठी वापरले जाणारे इंटरसेप्टर डागले आहेत. त्यामुळे अमेरिकेकडील महत्त्वाच्या शस्त्रसाठ्यात मोठी घट झाली असून, चीन आणि रशियासारख्या प्रतिस्पर्ध्यांविरोधातील भविष्यातील संघर्षासाठी अमेरिकेच्या तयारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, अमेरिकेकडील Patriot एअर डिफेन्स इंटरसेप्टरचा साठा सुमारे ६५ टक्क्यांनी घटला आहे. युद्धापूर्वी अमेरिकेकडे सुमारे २,३३० Patriot इंटरसेप्टर होते. त्यापैकी जवळपास १,५०० इंटरसेप्टर इराणकडून डागण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी वापरण्यात आले. आता जगभरात अमेरिकेकडे ८५० पेक्षा कमी Patriot इंटरसेप्टर शिल्लक असल्याचं वृत्त आहे.

इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना काही प्रसंगी एका ड्रोन किंवा क्षेपणास्त्राला पाडण्यासाठी दोन ते तीन इंटरसेप्टरचा वापर करण्यात आला. एका Patriot इंटरसेप्टरची किंमत सुमारे ४० लाख डॉलरपर्यंत असून, त्याच्या उत्पादनासाठी दोन वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. अमेरिका दरवर्षी सुमारे ६०० PAC-3 MSE इंटरसेप्टर तयार करते. त्यामुळे साठा पुन्हा भरून काढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. Patriot सोबत THAAD इंटरसेप्टरचाही साठा ३८ टक्क्यांनी घटला आहे.

याशिवाय अमेरिकेने Tomahawk क्रूझ क्षेपणास्त्रांसह ATACMS आणि Precision Strike Missiles (PrSM) यांचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. युद्धाच्या पहिल्या चार आठवड्यांत ८५० हून अधिक Tomahawk क्षेपणास्त्रं डागण्यात आली.

हे ही वाचा:

मोदींसोबत पुतिन-जिनपिंग यांची दिलखुलास भेट; शहबाज शरीफ पाहतच राहिले

उत्तराखंडमध्ये मान्यता नसलेले मदरसे होणार बंद!

“दहशतवाद कोणासाठीही रणनीतिक साधन ठरू शकत नाही”

भारताची अर्थव्यवस्था मजबूत; ‘झूठ की गूंज’ मात्र सुरूच

या शस्त्रसाठ्यातील घटेचा परिणाम युरोप आणि आशियातील अमेरिकेच्या मित्रदेशांवरही होण्याची शक्यता आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान अमेरिकेच्या संरक्षण प्रणालींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे इराण युद्धामुळे शस्त्रपुरवठ्यात होणारा विलंब आणि कमी झालेला साठा अमेरिकेसाठी भविष्यातील चीन-तैवान किंवा रशियासोबतच्या संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठं आव्हान ठरू शकतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा