30 C
Mumbai
Tuesday, September 15, 2026
घरस्पोर्ट्सलेकीच्या शिक्षणासाठी ४७ वर्षीय रमाबाईची मॅरेथॉनमध्ये अनवाणी धाव

लेकीच्या शिक्षणासाठी ४७ वर्षीय रमाबाईची मॅरेथॉनमध्ये अनवाणी धाव

तीन हजारांचे बक्षीस मुलीच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्धार

Google News Follow

Related

मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडील कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय देणारी प्रेरणादायी घटना बीडच्या अंबाजोगाईमध्ये घडली. ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी चक्क साडी नेसून आणि अनवाणी धावत मॅरेथॉन जिंकली. विशेष म्हणजे, या स्पर्धेतून मिळालेली तीन हजार रुपयांची बक्षिसाची रक्कम त्या आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी वापरणार आहेत.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवानिमित्त अंबाजोगाईत ‘अमृत दौड’ आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू झालेली ही शर्यत भाग्यनगर चौकात संपली. या स्पर्धेत अनेक तरुण-तरुणींनी स्पोर्ट्स शूज आणि ट्रॅकसूट घालून सहभाग घेतला होता. रमाबाई मात्र साधी साडी आणि चप्पल घालून स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
हे ही वाचा:
इराणविरोधातील युद्धामुळे अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांचा साठा घटला

विनेश फोगाटची डब्ल्यूएफआयरोधात कोर्टात ‘कुस्ती

एसबीआयच्या कर्जवसुलीवर मोठा प्रश्नचिन्ह

हरियाणात भाविकांच्या पिकअपची ट्रकला जोरदार धडक; ६ जणांचा मृत्यू

शर्यत सुरू झाल्यानंतर काही अंतरावर त्यांच्या चपला वारंवार घसरू लागल्या. मात्र त्यांनी हार मानली नाही. चपला हातात घेत त्यांनी अनवाणी धावण्यास सुरुवात केली. रस्त्यातील दगड, काटे आणि साडी सांभाळत धावणे हे आव्हान असतानाही त्यांचा वेग कमी झाला नाही. उलट त्यांनी अनेक तरुण स्पर्धकांना मागे टाकत थेट अंतिम रेषा गाठली आणि मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्यांच्या या जिद्दीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. मात्र रमाबाईंसाठी हा केवळ विजय नव्हता; आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी मिळालेली तीन हजार रुपयांची मदत होती. त्यांच्या या धावण्याने ‘आईची माया आणि जिद्द असेल तर कोणतेही अंतर अशक्य नाही’ हा संदेश पुन्हा अधोरेखित केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा