29 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरबिजनेसडॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी झेप

डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी झेप

६७ पैशांची जोरदार उसळी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एकाच वेळी दोन सकारात्मक घडामोडी समोर आल्या आहेत. जीडीपीच्या दमदार आकडेवारीनंतर आता डॉलरच्या तुलनेत रुपयानेही जोरदार मुसंडी मारली आहे. गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी व्यवहाराच्या सुरुवातीलाच रुपया तब्बल ६७ पैशांनी वधारून ९४.३० रुपये प्रति डॉलर या पातळीवर पोहोचला. जूननंतर एका दिवसातील ही रुपयाची सर्वात मोठी वाढ ठरली आहे. रुपयाला मिळालेल्या या बळामागे अनिवासी भारतीयांकडून आलेल्या मोठ्या प्रमाणावरील परकीय चलनाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे दिसून येत आहे.

रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने जून २०२६ मध्ये ‘एफसीएनआर-बी’ ठेवींना प्रोत्साहन देणारी विशेष डॉलर-रुपया स्वॅप सुविधा सुरू केली होती. या योजनेला अपेक्षेपेक्षाही मोठा प्रतिसाद मिळाला. ३१ ऑगस्टपर्यंत या सुविधेअंतर्गत एकूण १३६.३७ अब्ज डॉलरचा परकीय चलनप्रवाह भारतात आला. त्यापैकी तब्बल १२७.२२ अब्ज डॉलर ‘एफसीएनआर-बी’ ठेवींमधून आले आहेत. याशिवाय ओव्हरसीज फॉरेन करन्सी बॉरोइंगच्या माध्यमातून ५.२६ अब्ज डॉलर, तर बाह्य व्यावसायिक कर्जातून ३.८९१ अब्ज डॉलर भारतात आले.
हे ही वाचा:
हवाई दलाच्या स्वदेशी शस्त्रसामर्थ्यात ‘खगांतक-243’ची भर

कराची अंधारात! १६-२४ तासांच्या वीजकपातीने नागरिक हैराण

कोलकात्यात तृणमूलचे कार्यालय फोडले

पाकिस्तानचे एफ-१६ पाडणारे अभिनंदन हवाई दलातून निवृत्त

परकीय चलनाची ही मोठी आवक भारतीय रुपयासाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. बाजारात डॉलरची उपलब्धता वाढल्याने रुपयावरील दबाव कमी झाला असून, भारतीय रिझर्व्ह बँकेलाही चलन बाजारातील चढ-उतार नियंत्रित करण्यासाठी अधिक वाव मिळाला आहे. त्याचवेळी डॉलर निर्देशांकातील नरमाई आणि काही आशियाई चलनांची झालेली सुधारणा याचाही रुपयाला फायदा झाला आहे. मात्र, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ९५ डॉलरच्या आसपास असल्याने रुपयासमोरचे आव्हान अद्याप कायम आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत असल्याने तेल महाग झाल्यास रुपयावर पुन्हा दबाव येऊ शकतो.

रुपया मजबूत राहिल्यास त्याचा परिणाम केवळ परकीय चलन बाजारापुरता मर्यादित राहत नाही. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने कच्चे तेल, इंधन आणि अन्य आयात वस्तूंच्या आयातीचा खर्च तुलनेने कमी होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात रुपयाची ही मजबुती कायम राहिली, तर पेट्रोल-डिझेल, एलपीजी आणि काही आयातीत वस्तूंच्या किमतींवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, रुपयाची एका दिवसातील वाढ थेट आणि तात्काळ इंधन दरकपातीत रूपांतरित होईलच असे नाही; त्यासाठी आंतरराष्ट्रीय तेलाचे दर, कर आणि इतर खर्चही महत्त्वाचे ठरतात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा