29.1 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरदेश दुनिया७६९ कोटींच्या दारुगोळा खरेदी घोटाळ्यानंतर एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा

७६९ कोटींच्या दारुगोळा खरेदी घोटाळ्यानंतर एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा

भारतीय कंपनीसोबतचा संरक्षण करार वादात

Google News Follow

Related

युक्रेनला लष्करी मदत म्हणून दारुगोळा पुरवण्यासाठी करण्यात आलेल्या तब्बल ७० दशलक्ष युरो अर्थात ७६८ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वादग्रस्त संरक्षण करारामुळे एस्टोनियात मोठी राजकीय हालचाल झाली आहे. तोफगोळे विकण्याचा कोणताही पूर्वेतिहास नसलेल्या भारतीय मालकीच्या कंपनीसोबत करण्यात आलेल्या या करारावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर एस्टोनियाचे संरक्षण मंत्री हॅनो पेवकुर यांनी बुधवारी राजीनामा दिला.

२०२२ पासून संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या पेवकुर यांनी संरक्षण क्षेत्रातील त्रुटींची राजकीय जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा जाहीर केला. एस्टोनियाच्या राष्ट्रीय लेखापरीक्षण कार्यालयाने संरक्षण खर्च आणि दारुगोळा खरेदी प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

हा संपूर्ण वाद २०२४ मध्ये एस्टोनियाच्या संरक्षण गुंतवणूक केंद्राने इटलीत नोंदणीकृत असलेल्या डेटासेल एसआरएल या कंपनीसोबत केलेल्या कराराशी संबंधित आहे. ही कंपनी त्याच वर्षी भारतातील नेको डिफेन्स म्युनिशन्सने अधिग्रहित केली होती. युक्रेनला रशियाविरुद्धच्या युद्धात दारुगोळ्याची तीव्र गरज असताना एस्टोनियाने डेटासेलकडून तोफगोळे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या खरेदीसाठी युरोपियन युनियनच्या ‘युरोपियन पीस फॅसिलिटी’मधील निधीचा वापर करण्यात आला.

एस्टोनियाने ऑगस्ट २०२४ मध्ये पहिल्या करारावर स्वाक्षरी करून सुमारे १५ दशलक्ष युरो आगाऊ दिले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये आणखी एका करारासाठी १० दशलक्ष युरोंहून अधिक रक्कम देण्यात आली. वर्षअखेरीस विविध करारांअंतर्गत कंपनीला दिलेली आगाऊ रक्कम सुमारे ७० दशलक्ष युरोंपर्यंत पोहोचली. हा दारुगोळा काही महिन्यांत युक्रेनला पोहोचेल, अशी अपेक्षा होती. मात्र उत्पादनातील अडचणींमुळे पुरवठा वारंवार लांबला. अखेरीस २०२५ मध्ये काही दारुगोळा मिळाल्यानंतर तो अपेक्षित गुणवत्ता निकषांवर खरा उतरला नसल्याचे एस्टोनियन माध्यमांनी म्हटले आहे. यानंतर एस्टोनियाच्या संरक्षण गुंतवणूक केंद्राने कंपनीसोबतचे करार रद्द केले आणि आगाऊ दिलेली रक्कम परत करण्याची मागणी केली.

हे ही वाचा:

GSLV-F17 चे काउंटडाऊन सुरू; भारताचा पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह झेपावणार

ड्रोनपासून रणगाड्यापर्यंत… बेल्जियमसोबतच्या करारांमधून स्वदेशी उत्पादनाला चालना

टीकाकारांनी समान गोष्टींची तुलना करायला हवी!

बलात्कार प्रकरणे मिटवण्यासाठी ५ कोटी? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह पत्नीवर आरोप

मात्र डेटासेलने हे आरोप फेटाळले आहेत. कंपनीने एस्टोनियन सरकारला सुमारे ५९ दशलक्ष युरो किमतीचा दारुगोळा पुरवल्याचा दावा केला आहे. कंपनीने करार रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली असून हा वाद आता आंतरराष्ट्रीय लवादाकडे गेला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा