28.9 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरविशेषअभिनयाचा ‘नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड

अभिनयाचा ‘नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड

वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, नाना पाटेकर गोव्यातील त्यांच्या घरी असताना त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर वैद्यकीय पथक त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पुढील उपचारांसाठी मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयात डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सकाळी सुमारे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी मेडिको-लीगल केस नोंदवण्यात आली असून पुढील वैद्यकीय प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास

नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयातून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयातील तीव्रता, संवादफेक आणि व्यक्तिरेखांमध्ये पूर्णपणे शिरण्याची शैली यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करू शकले.

‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘यशवंत’ यांसारख्या हिंदी चित्रपटांसह ‘नटसम्राट’सारख्या मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर या व्यक्तिरेखेने त्यांच्या अभिनयाची वेगळी उंची प्रेक्षकांसमोर आणली.

अभिनयासोबतच नाना पाटेकर यांनी दिग्दर्शनातही काम केले. ‘प्रहार: द फायनल अटॅक’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक महत्त्वाचे सन्मान मिळवले. २०१३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

हे ही वाचा:

‘तेजस’साठी अमेरिकेतून चार इंजिन भारतात दाखल

इराण युद्धामुळे अमेरिकेने गमावले ३.३ अब्ज डॉलर

रशिया-युक्रेन युद्धविरामासाठी भारताचा त्रिपक्षीय प्रस्ताव

देशासमोर सत्ता, पद, प्रतिष्ठा काहीही मोठे नाही!

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. आपल्या दमदार अभिनयाने अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या ज्येष्ठ कलाकाराच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रभावी कलाकार गमावला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा