28.9 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरदेश दुनियाइराण युद्धामुळे अमेरिकेने गमावले ३.३ अब्ज डॉलर

इराण युद्धामुळे अमेरिकेने गमावले ३.३ अब्ज डॉलर

८१ विमाने-ड्रोन्सच्या नुकसानीचा बसला फटका

Google News Follow

Related

इराणविरोधातील युद्धात अमेरिकेला मोठी हवाई हानी सहन करावी लागल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या (CRS) नव्या अहवालानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेची किमान ८१ लष्करी विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन गमावले गेले किंवा त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची किंमत जवळपास ३.३ अब्ज डॉलर इतकी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या नुकसानीमध्ये अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचाही समावेश आहे. अमेरिकेने १२ F-15E फायटर जेट्स, एक F-35A Lightning II, दोन A-10 Thunderbolt II आणि सात KC-135 Stratotanker विमाने गमावली किंवा त्यांचे नुकसान झाले. याशिवाय E-3 Sentry, MC-130J, HH-60W यांसारख्या महत्त्वाच्या लष्करी विमानांनाही फटका बसला आहे.

अमेरिकेच्या हवाई नुकसानीमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे ४५ MQ-9 Reaper ड्रोनचे नुकसान. हे ड्रोन गुप्तचर माहिती गोळा करण्याबरोबरच लक्ष्यांवर हल्ले करण्यासाठी वापरले जातात. एका MQ-9 Reaper ची किंमत साधारण ३० ते ५० दशलक्ष डॉलर इतकी असू शकते. या नुकसानीमुळे अमेरिकेच्या Reaper ड्रोनच्या ताफ्यावरही परिणाम झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, अमेरिकेकडे असलेल्या या ड्रोनची संख्या घटून सुमारे १३५ वर आली आहे. अमेरिकन हवाई दलाचे लक्ष्य किमान १८९ तैनात करता येण्याजोगे Reaper ड्रोन उपलब्ध ठेवण्याचे आहे.

अहवालानुसार, अमेरिकेच्या F-15E विमानांपैकी तीन विमानांना २ मार्च रोजी कुवेतच्या आकाशात ‘फ्रेंडली फायर’मध्ये पाडण्यात आले. त्यानंतर आणखी एका F-15E विमानाला इराणवरील कारवाईदरम्यान फटका बसला. याशिवाय सप्टेंबरमध्ये जॉर्डनमधील मुवाफ्फाक अल-साल्ती एअर बेसवर झालेल्या इराणी हवाई हल्ल्यांमध्ये आणखी आठ F-15E विमानांचे किरकोळ नुकसान झाले. यातील काही विमाने दुरुस्तीनंतर पुन्हा सेवेत दाखल झाली आहेत. अमेरिकेच्या पाचव्या पिढीतील अत्याधुनिक F-35A Lightning II विमानालाही इराणवरील कारवाईदरम्यान नुकसान झाले. या विमानाची किंमत ९२ दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

रशिया-युक्रेन युद्धविरामासाठी भारताचा त्रिपक्षीय प्रस्ताव

देशासमोर सत्ता, पद, प्रतिष्ठा काहीही मोठे नाही!

“हे होईल, आम्ही करून दाखवू” पंतप्रधान मोदींचा देशाला नवा मंत्र

सोलापुरात डिटर्जंटयुक्त दूध, नवी मुंबईत रसायनमिश्रित केळी जप्त

अमेरिकेने एक E-3 Sentry airborne early warning and control विमानही गमावले आहे. Boeing 707 वर आधारित हे विमान अमेरिकेच्या हवाई मोहिमांसाठी महत्त्वाचे मानले जाते. एका E-3 Sentry ची किंमत सुमारे २७० दशलक्ष डॉलर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे याशिवाय अमेरिकेने एक AH-64 Apache अटॅक हेलिकॉप्टर, चार AH-6 Little Bird हलकी अटॅक हेलिकॉप्टर आणि एक MH-60 Sea Hawk हेलिकॉप्टरही गमावले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा