29.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरराजकारण“हे होईल, आम्ही करून दाखवू” पंतप्रधान मोदींचा देशाला नवा मंत्र

“हे होईल, आम्ही करून दाखवू” पंतप्रधान मोदींचा देशाला नवा मंत्र

२५ वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर पंतप्रधान मोदींचा संदेश

Google News Follow

जगभरात युद्धांचे सावट असताना, अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांसमोर आव्हाने उभी असताना आणि एकूणच अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. निराशेच्या या वातावरणात थांबण्याऐवजी आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश देत त्यांनी देशवासीयांना ‘वी विल डू इट’ हा नवा मंत्र दिला. “हे होऊ शकत नाही” या मानसिकतेतून बाहेर पडून “हे होईल, आम्ही करून दाखवू” असा आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापासून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा २५ वर्षांचा प्रवास पूर्ण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाच्या प्रवासातील बदलत्या मानसिकतेवर भर दिला. ७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर २०१४ मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. २०१४, २०१९ आणि २०२४ या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजय मिळाला. ९ जून २०२४ रोजी मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अशा प्रकारे ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सरकारच्या प्रमुखपदी त्यांच्या सलग २५ वर्षांचा टप्पा पूर्ण झाला.

‘हे होणार नाही’पासून ‘आम्ही करून दाखवू’पर्यंत

आपल्या २५ वर्षांच्या प्रशासनातील प्रवासाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील बदलत्या आत्मविश्वासाकडे लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी मोठ्या आव्हानांकडे पाहताना “हे होऊ शकत नाही” अशी मानसिकता होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून, “हे होईल” आणि “आम्ही करून दाखवू” असा विश्वास देशात निर्माण झाला आहे. आव्हाने कायम राहणार आहेत आणि ती वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत राहतील. मात्र प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची क्षमता भारताने निर्माण केली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. त्यांच्या मते, एखादी गोष्ट शक्य आहे आणि ती आपण पूर्ण करू शकतो, या सामूहिक विश्वासातूनच मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरतात. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी देशाला आणि तेथील जनतेला ‘आम्ही हे करून दाखवू’ या मंत्रासह पुढे जावे लागेल.

अजूनही मी विद्यार्थीच- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “माझी शिकण्याची क्षमता कधीही कमी होऊ नये. मी जितके जास्त शिकेन, तितकीच देशासाठी चांगले काम करण्याची माझी क्षमता वाढेल. जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा माझे मन कृतज्ञतेने भरून येते. मला काहीतरी शिकवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक घटनेचा मी आभारी आहे. ज्यांनी मला जिंकवले, त्यांनी मला नम्रता शिकवली. ज्यांनी मला पाडले, त्यांनी मला पुन्हा उठायला शिकवले.” पुढे ते म्हणाले की, शिकण्याची आवड जीवनाचा एक भाग बनली असून आजही मी स्वतःला एक विद्यार्थीच मानतो.”

हे ही वाचा:

सोलापुरात डिटर्जंटयुक्त दूध, नवी मुंबईत रसायनमिश्रित केळी जप्त

“इस्लामकडून फ्रान्स काबीज करण्याचा प्रयत्न”; ट्रम्प यांचा स्थलांतराकडे इशारा

रशिया किनाऱ्याजवळ भारतीय क्रू असलेल्या तेल टँकरवर ड्रोन हल्ला

न्यूट्रिनो कणांच्या शोधासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल

देशवासियांचा विश्वास हीच ताकद

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज सकाळी मी श्री विनायक मंदिराला भेट दिली. मी देशासाठी, १.४ अब्ज भारतीयांसाठी आणि स्वतःसाठी देवाकडे प्रार्थना केली. माझी प्रार्थना आहे की, देवा, मला माझ्या देशासाठी आणखी मोठ्या ऊर्जेने काम करण्याची शक्ती आणि सामर्थ्य दे. आज मी जे काही आहे, जिथे कुठे आहे, माझ्यावर जी काही जबाबदारी आहे, त्यामध्ये जनतेचाच सर्वात मोठा वाटा आहे. माझ्यासाठी जनता म्हणजे देवस्वरूप आहे. लाखो देशवासियांचा विश्वास आणि लाखो कार्यकर्त्यांची मेहनत हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. हा २५ वर्षांचा अनुभव ही एक मोठी संपत्ती आहे आणि ही संपत्ती केवळ मोदींची नसून ती देशाची आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा