30.5 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरराजकारणदेशासमोर सत्ता, पद, प्रतिष्ठा काहीही मोठे नाही!

देशासमोर सत्ता, पद, प्रतिष्ठा काहीही मोठे नाही!

२५ वर्षांच्या सेवेनंतर पंतप्रधान मोदी जनतेसमोर नतमस्तक

Google News Follow

Related

“जेव्हा गोष्ट देशाची असते, तेव्हा पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यांना काहीही महत्त्व नसते. देशासमोर सत्ता सुख काहीही मोठे नाही. पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल; मात्र भारतासारखी पुण्यभूमी मिळणार नाही,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. सरकारच्या प्रमुखपदी २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाचा उल्लेख करत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले.

गेल्या २५ वर्षांचा प्रवास लोक उपलब्धी मानतात; मात्र आपल्यासाठी तो व्यक्तिगत महिमामंडणाचा विषय नसल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. “मी महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे, तर मिशनसाठी जगणारा माणूस आहे,” असे सांगत त्यांनी मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीचे पालन करत देशसेवा हेच जीवनाचे ध्येय राहिल्याचे नमूद केले.

‘जीवनाचं एकच ध्येय होतं—देशाची निरंतर सेवा’

आपल्या संपूर्ण प्रवासामागे देशाची निरंतर सेवा हेच एकमेव ध्येय असल्याचे मोदी यांनी सांगितले. कर्माला आपण कर्तव्य मानतो आणि काम थांबता कामा नये, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “कर्म हीच सेवा आहे. मी कर्माला आपलं कर्तव्य मानतो. कर्म माझ्यासाठी देशासाठी साधना आहे. कर्म देशासाठी आणि देशवासीयांसाठी आहे,” असे मोदी म्हणाले. देशाने आणि जनतेने आपल्याला संधी दिली, मात्र पद, प्रतिष्ठा किंवा अधिकार यापेक्षा देशासाठी काम करण्याला अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. देशसेवेची संधी मिळणे हीच सर्वात मोठी बाब असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले.

‘महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे, मिशनसाठी जगतो’

गेल्या २५ वर्षांच्या निरंतर प्रवासाकडे लोक उपलब्धी म्हणून पाहतात; मात्र आपल्यासाठी हा व्यक्तिगत महिमामंडणाचा विषय नसल्याचे मोदी यांनी सांगितले. आपल्या सार्वजनिक जीवनाच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून देताना त्यांनी वयाच्या २५व्या वर्षी जंगलात आणि आदिवासी भागात सेवा करण्याचा अनुभव आल्याचे नमूद केले. आपला राजकीय प्रवास सुरुवातीला संघटनात्मक स्वरूपाचा होता. निवडणुकीच्या राजकारणात चमकण्याची इच्छा असती तर आपण त्या क्षेत्रात उतरलो असतो; मात्र आपला स्वभाव तसा नव्हता, असे मोदी यांनी स्पष्ट केले. “माझं काय होईल, याचा विचार कधीच केला नाही. मी महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे, तर मिशनसाठी जगणारा माणूस आहे. मला जी जबाबदारी मिळाली, ती मी निभावत गेलो,” असे मोदी म्हणाले.

‘पंतप्रधान होईन, असं कधी वाटलं नव्हतं’

७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा सरकारच्या प्रमुखपदी २५ वर्षे पूर्ण करण्याचा असा प्रसंग येईल, असे कधीच वाटले नव्हते, असे मोदी यांनी सांगितले. आज प्रशासनातील २५ वर्षांचा प्रवास पूर्ण झाला असून, हा टप्पा जनतेच्या आशीर्वादामुळे आणि सातत्याने दाखवलेल्या विश्वासामुळे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान होण्याची अपेक्षाही आपण कधी केली नव्हती, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘लोकशाही आणि संविधानाचा आभारी’

आपल्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांचा प्रवास भारतीयांचा विश्वास आणि मिळालेल्या संधीमुळे पूर्ण करता आला, असे मोदी यांनी सांगितले. यासाठी भारताची लोकशाही आणि संविधान यांचे आपण आभारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मला जनतेने विधानसभा आणि लोकसभेत यश दिले. देशाने मला संधी दिली, लोकांनी मला संधी दिली. मी संविधानालाही नमन करतो,” असे मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

“हे होईल, आम्ही करून दाखवू” पंतप्रधान मोदींचा देशाला नवा मंत्र

सोलापुरात डिटर्जंटयुक्त दूध, नवी मुंबईत रसायनमिश्रित केळी जप्त

“इस्लामकडून फ्रान्स काबीज करण्याचा प्रयत्न”; ट्रम्प यांचा स्थलांतराकडे इशारा

रशिया किनाऱ्याजवळ भारतीय क्रू असलेल्या तेल टँकरवर ड्रोन हल्ला

‘जनतेसमोर नतमस्तक होतो’

सरकारच्या प्रमुखपदी सेवा बजावताना २५ वर्षे पूर्ण झाल्याचा हा प्रसंग जनतेच्या आशीर्वादाचे फळ असल्याचे मोदी यांनी म्हटले. “जनतेने सातत्याने दाखवलेल्या विश्वासाचा हा परिणाम आहे. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जनतेसमोर मी नमन करतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. २५ वर्षांचा हा प्रवास आपल्यासाठी केवळ पदांचा किंवा राजकीय उपलब्धींचा प्रवास नसून, देशाची निरंतर सेवा करण्याची संधी असल्याचे मोदी यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा