30 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारणतेलंगणात बीआरएसच्या दोन आमदारांना अटक

तेलंगणात बीआरएसच्या दोन आमदारांना अटक

विधानसभा अध्यक्षांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य

Google News Follow

तेलंगणात सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. विधानसभा अध्यक्ष गड्डम प्रसाद कुमार यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बीआरएसचे दोन विधान परिषद सदस्य तत्ता मधुसूदन आणि एन. नवीन कुमार रेड्डी यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सात सप्टेंबर रोजी विधानभवन परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. यावेळी झालेल्या वादादरम्यान दोन्ही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. विधानसभा अध्यक्षांच्या विशेष कर्तव्यावरील अधिकाऱ्याने सैफाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीत दोन्ही आमदारांनी अध्यक्षांच्या अधिकारावर, घटनात्मक भूमिकेवर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित करत त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
जपानचा ७-० ने धुव्वा उडवत भारत उपांत्यपूर्व फेरीत

गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ

दिपके बोस्टनमध्ये धुणीभांडी करत होता काय?

संयुक्त राष्ट्राच्या नव्या नकाशात अरुणाचल, अक्साई चीन स्वतंत्र प्रदेश

या प्रकरणामुळे तेलंगणाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी कथित वक्तव्यांचा तीव्र निषेध करत, हा केवळ विधानसभा अध्यक्षांचा नव्हे तर तेलंगणातील चार कोटी जनतेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसमधील दलित आमदार आणि विधान परिषद सदस्यांनीही कथित वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बीआरएसचे आमदार तत्ता मधुसूदन यांनी मात्र विधानसभा अध्यक्षांविरोधात कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. त्यामुळे या अटकेनंतर काँग्रेस आणि बीआरएसमधील राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. विधानभवनाबाहेरील एका वादातून सुरू झालेला हा प्रकार आता थेट कायदेशीर कारवाईपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणाकडे तेलंगणाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा