28 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरबिजनेसमुंबई-पुण्यासह देशभरात बँकांना सलग चार दिवस टाळे!

मुंबई-पुण्यासह देशभरात बँकांना सलग चार दिवस टाळे!

संपासह शनिवार, रविवार आणि गणेश चतुर्थीची सुट्टी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मुंबई, पुण्यासह राज्यातील आणि देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे आणि त्यानंतरच्या सलग सुट्ट्यांमुळे बँकांच्या शाखांचे कामकाज चार दिवस ठप्प राहणार आहे. शुक्रवारी ११ सप्टेंबरला बँक कर्मचाऱ्यांचा संप आहे. त्यानंतर १२ सप्टेंबरला दुसरा शनिवार, १३ सप्टेंबरला रविवार आणि १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने बँकांच्या प्रत्यक्ष शाखा सलग चार दिवस बंद राहतील. त्यामुळे शाखेत जाऊन करावयाचे व्यवहार असलेल्या ग्राहकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

बँक कर्मचारी संघटनांनी आठवड्यातून पाच दिवस बँकिंग व्यवस्था लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. सध्या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. मात्र, उर्वरित शनिवारची सुट्टी देऊन सोमवार ते शुक्रवार पाच दिवस बँकिंग सेवा सुरू ठेवावी, अशी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी कामकाजाच्या वेळेत आवश्यक वाढ करण्याची तयारीही संघटनांनी दर्शवली आहे.
हे ही वाचा:
बांगलादेशला हरवून भारत आशिया कपच्या फायनलमध्ये!

पाकिस्तानात १४ वर्षांच्या हिंदू मुलींचे अपहरण; धर्मांतर मग निकाह

‘लाल धातू’च्या दरात तुफान तेजी

AI च्या विरोधात चक्क रोबोट्सच रस्त्यावर उतरले

सलग चार दिवस शाखा बंद राहणार असल्याने रोख रक्कम काढणे, धनादेश जमा करणे, कर्जाशी संबंधित कामे, खातेविषयक कागदपत्रे आणि इतर प्रत्यक्ष शाखेत करावे लागणारे व्यवहार पुढे ढकलावे लागू शकतात. मात्र, एटीएम, यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगसारख्या डिजिटल सेवा सुरू राहण्याची शक्यता असल्याने ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक बँकिंग कामे असलेल्या ग्राहकांनी शक्य असल्यास ती आधीच उरकून घेणे किंवा डिजिटल पर्यायांचा वापर करणे योग्य ठरणार आहे.

दरम्यान, पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याच्या मागणीवर तोडगा न निघाल्यास कर्मचारी संघटनांनी पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. सप्टेंबरअखेर पुन्हा संपाची हाक देण्यात आली असून, मागण्या मान्य न झाल्यास ऑक्टोबरपासून अनिश्चितकालीन संपाचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे बँकिंग सेवांवर पुढील काळातही परिणाम होण्याची शक्यता असून, ग्राहकांनी आगामी सुट्ट्या आणि संपाचे दिवस लक्षात घेऊन आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा