29 C
Mumbai
Saturday, September 19, 2026
घरक्राईमनामापंजाबमध्ये गायक गुलाब सिद्धू यांच्या घरावर तुफान गोळीबार

पंजाबमध्ये गायक गुलाब सिद्धू यांच्या घरावर तुफान गोळीबार

तीन हल्लेखोर CCTV मध्ये कैद

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पंजाबच्या बरनाला जिल्ह्यातील फरवाही गावात प्रसिद्ध पंजाबी गायक गुलाब सिद्धू यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी तुफान गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी आणि रविवारीच्या मध्यरात्री सुमारे दीड ते दोनच्या दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या तीन तरुणांनी सिद्धू यांच्या घराच्या गेटवर तब्बल सात ते आठ गोळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्ल्यात घरातील कोणालाही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे गोळीबार झाला त्यावेळी गुलाब सिद्धू परदेशात एका संगीत कार्यक्रमासाठी गेले होते.

या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही आणि मोबाइल व्हिडिओ समोर आला असून त्यात हल्ल्याची धक्कादायक दृश्ये कैद झाली आहेत. एकाच मोटारसायकलवरून आलेले तीन तरुण घराजवळ थांबले. त्यातील दोघांनी घराच्या गेटच्या दिशेने गोळीबार केला, तर तिसऱ्या तरुणाने आपल्या मोबाइलमध्ये संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले. गोळीबार केल्यानंतर तिन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
हे ही वाचा:
सिक्कीममध्ये भूस्खलनाचा मोठा तडाखा

“ही माझ्याच जुन्या चुकांची शिक्षा आहे”

महत्त्वाच्या खनिजांचा शस्त्र म्हणून वापर प्रगतीला अडथळा !

झोमॅटोची कॅश ऑन डिलिव्हरीही आता महागणार

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुंड डोनी बल याने घेतल्याचा कथित ऑडिओ समोर आला आहे. मात्र या ऑडिओची सत्यता अद्याप पोलिसांकडून तपासली जात आहे. गुलाब सिद्धू हे दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांचे जवळचे मित्र होते. मूसेवाला यांच्या हत्येनंतर गुलाब सिद्धू यांनाही सातत्याने धमक्या आणि खंडणीसाठी फोन येत असल्याचे समोर आले होते. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेसाठी यापूर्वीच दोन सुरक्षारक्षक तैनात केले होते.

गुलाब सिद्धू यांच्यावर हल्ल्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. जानेवारी २०२६ मध्येही त्यांच्यावर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी बरनाला पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून हा कट उधळून लावला होता. आता पुन्हा त्यांच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे पंजाबमधील गायक आणि कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून गावातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवरील कॅमेऱ्यांचीही तपासणी सुरू आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रिकाम्या काडतुसांसह महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा