30.1 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरधर्म संस्कृतीगणपती एकदंत का? अस्त्राचा मान की ज्ञानासाठी त्याग?

गणपती एकदंत का? अस्त्राचा मान की ज्ञानासाठी त्याग?

Google News Follow

Related

श्रीगणेशाच्या वेगवेगळ्या नावांचा उल्लेख करताना त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे तसेच रुपावरुन दिल्या गेलेल्या अतिशय प्रसिद्ध, प्रचलित नावांपैकी एक नाव म्हणजे ‘एकदन्त’. ‘एकदन्त’ हा शब्दच स्पष्ट करतो की ज्याला एकच दात इथे एकच सुळा असलेला या अर्थी. पण मग दात मुळात एकच नसून एक दात पडलेला / तोडलेला यासाठी एकदंत नावामागे कथा ऐकावी लागेल.

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि |

तन्नो दन्ती प्रचोदयात ||

श्रीगणेशाच्या या मंत्रातच त्याची ‘एकदन्त’ आणि ‘वक्रतुण्ड’ ही दोन वैशिष्टय़पूर्ण, सर्वपरिचित नावे अंतर्भूत आहेत. गणपतीला ‘एकदन्त’ हे नाव पडण्याच्या अनेक पौराणिक कथा, आख्यायिका आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध असणारी परशुराम आणि गणपतीच्या भेटीची. ही कथा ब्रह्मवैवर्त पुराणातील गणेशखंडाशी जोडली आहे.

या कथेनुसार अर्जुनाचा वध केल्यानंतर भगवान परशुराम भगवान शिवांच्या भेटीसाठी कैलास पर्वतावर येतात. त्यावेळी भगवान शिव ध्यानमग्न होते तर माता पार्वती विश्रांती घेत होत्या आणि गणपती द्वारावर पहारा देत होते. त्यांनी परशुरामांना आत जाण्यापासून रोखले, अडथळे निर्माण केले. मात्र, परशुरामांना शिवांची भेट हवीच होती. अशाने त्यांचा आत जाण्याचा आग्रह, प्रयत्न मात्र गणपती आपल्या कर्तव्याप्रती ठाम राहिले. दोघांमधील वादाचे रुपांतर शेवटी युद्धात झाले. गणपतीच्या युद्ध कौशल्याने, वरचढ ठरल्याने परशुराम संतप्त होऊन अखेर त्यांनी शिवांकडूनच मिळालेलं दिव्य अस्त्र अर्थात परशू.. साधारण कुऱ्हाडीसारखं शस्त्र गणपतीवर फेकलं. श्रीगणेशाला हे अस्त्र आपल्या वडिलांचे असल्याचे माहित होते. त्यामुळे त्या अस्त्राचा मान राखण्यासाठी त्यांनी तो प्रहार स्वतःच्या डाव्या दातावर घेतला. परशूच्या प्रहारामुळे तो दात तुटला आणि मग गणपतीला ‘एकदन्त’ हे नाव मिळाल्याचं सांगितलं जातं.

एकदन्ताच्या दुसर्‍या कथेचा संदर्भ थेट महाभारताच्या लेखनापर्यंत घेऊन जातो. महाभारताच्या आदिपर्वात व्यासांनी सांगत असणारा महाभारत ग्रंथ गणपतीने लिहून घेतला असं वर्णन आढळतं. प्रचलित आख्यायिकेनुसार महर्षी वेदव्यासांनी महाभारत सांगण्यास सुरुवात केली व गणपती ते लिहू लागले. इथे गणपतीने एक अट ठेवली होती. लेखन सुरु झाल्यानंतर ते मध्येच थांबता कामा नये. पण लेखन सुरु असताना अचानक गणपतीची लेखणी तुटली. आता लेखन थांबलं तर स्वतःचीच अट मोडणार होती. त्यामुळे गणपतीने आपला एक दात तोडून त्याचा लेखणीसारखा उपयोग केला. हे कथानक सांगितलं जातं. मात्र, हा तपशील मूळ महाभारतातील त्या प्रसंगात आढळत नाही. तर तो नंतरच्या गणेशपरंपरेतील प्रसिध्द आख्यायिकेत दिसतो.

यानुसार गणपतीचा तुटलेला दात ज्ञानासाठी केलेल्या त्यागाचं प्रतीक मानला जातो. तर दुसरीकडे वडिलांच्या अस्त्राचा मान राखण्यासाठी स्वतःच्या दातावर प्रहार झेलणं यात आदर, अभिमान हे गुण दिसतात. दोन्ही कथांमध्ये दात तुटतो परंतु त्यामुळे गणपतीचं रुप अपूर्ण होत नाही. उलट त्याच दातामुळे गणपतींचं ‘एकदन्त’ हे नाव त्यांची ओळख बनले आहे. इथे पांढऱ्या शुभ्र दाताची लेखणी ही कदाचित आत्ताच्या युगातील साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या शालेय शिक्षणाची सुरुवात होताना दगडी, काळी पाटीवर अक्षरे लिहायला असणारी पांढरी दगडी लेखणी या आधुनिक संदर्भात दिसते असं वाटतं. अशा या श्रीगणेशाच्या अर्थात ज्ञानदाता, विद्यादाता रुपाला शोभणाऱ्या ‘एकदन्त’ नावाला, रुपाला नमस्कार.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा