गणपतीची आराधना, उपासना करताना विघ्ने हरणारा विघ्नहर्ता, मंगल करणारा मंगलमूर्ती आणि बुद्धीची देवता असणारा बुद्धीदाता हीच रूपे समोर येतात. मात्र उपासनेच्या परंपरेत गणेशाकडे केवळ विघ्न दूर करणारा देव इतकेच नाही, तर शरीर, मन आणि सभोवतालचे रक्षण व्हावे या भावनेचाही अंतर्भाव दिसून येतो. याच संकल्पनेचे शब्दरूप म्हणजे “श्री गणेश कवच.”



