29 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणभूगोल कवचधारी हुतींनी अण्वस्त्रधारी पाकिस्तानला घाम फोडला |

भूगोल कवचधारी हुतींनी अण्वस्त्रधारी पाकिस्तानला घाम फोडला |

Related

बलोच बंडखोर, टीटीपी, अफगाण तालिबानांनंतर पाकिस्तानचे उरली सुरली लाज काढण्याचे काम हुती बंडखोरांनी केलेले आहे. सतत अण्वस्त्रधारी देश असल्याच्या टीमक्या वाजवल्यामुळे पाकिस्तानच्या नेत्यांना सौदी सारखे देश जवळ करतात. हुती बंडखोरांसाठे छोटे कमकुवत गट मात्र पाकिस्तानी अण्वस्त्रांना भीक घालताना दिसत नाहीत. सौदी अरेबियाच्या बचावासाठी हस्तक्षेप केल्यास सणसणीत उत्तर देऊ असा जाहीर इशारा त्यांनी दिलेला आहे. हुती बंडखोरांकडे इराणने पुरवलेली बॅलेस्टीक क्षेपणास्त्रे आहेत. सौदी अरेबियाच्या रियाध आणि यानबूपर्यंत ही क्षेपणास्त्रे धडकली आहेत. सौदीचे जबरदस्त नुकसान झालेले आहे. हुतींना चेचण्यासाठी पाकिस्तान काही हालचाल करेल अशी सौदीची अपेक्षा होती. प्रत्यक्षात पाकिस्तानने काहीही हालचाल केली नाही, त्यामुळे सौदीचे राज्यकर्ते नाराज आहेत. ‘अशर्क अल अवसात’ आणि ‘अरब न्यूज’ आदी माध्यमांतून आता पाकिस्तान-तुर्कीयेचा समावेश असलेल्या मक्का कराराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाकिस्तानची मोठी गोची आहे. कारण हुतींना भिडणे याचा अर्थ इराणशी वाकडे घेणे. हुतींच्या पाठिशी इराण आहे, ही बाब जगजाहीर आहे. हुतींकडे असलेला शस्त्रसाठा इराणकडून आलेला आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा