28.9 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरस्पोर्ट्सतिरंदाजीत भारताची दमदार आगेकूच; चार संघ उपांत्य फेरीत

तिरंदाजीत भारताची दमदार आगेकूच; चार संघ उपांत्य फेरीत

Google News Follow

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी दमदार कामगिरी करत कंपाउंड आणि रिकर्वच्या मिश्र संघांसह चार भारतीय संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तिरंदाजीत भारताच्या पदकाच्या आशा आणखी बळावल्या आहेत.

कंपाउंड मिश्र प्रकारात चिकिथा तानिपार्थी आणि साहिल जाधव यांनी शानदार खेळ करत उपांत्य फेरी गाठली. राउंड ऑफ १६ मध्ये त्यांनी मंगोलियाचा १६०-१४६ असा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानला १५९-१५४ असे नमवत अंतिम चारमध्ये स्थान मिळवले.

रिकर्व मिश्र प्रकारात धीरज बोम्मादेवरा आणि कुमकुम अनिल मोहोद यांनीही दमदार कामगिरी केली. त्यांनी राउंड ऑफ १६ मध्ये यूएईचा ६-० असा धुव्वा उडवला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामलाही ६-० असे पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

कंपाउंड महिला संघानेही शानदार कामगिरी केली. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिथा तानिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांनी कझाकिस्तानचा २३३-२३० असा पराभव करत अंतिम चारमध्ये धडक मारली.

पुरुषांच्या कंपाउंड संघानेही विजयाची मालिका कायम ठेवली. कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम यांनी भूतानवर २३५-२३२ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली.

पदकासाठी भारत सज्ज

हांगझोऊ २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने तिरंदाजीत ९ पदकांची विक्रमी कमाई केली होती. यामध्ये ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदकांचा समावेश होता. यंदाही भारतीय तिरंदाजांनी सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी करत पदकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा