28.7 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरस्पोर्ट्सभारताने अॅथलेटिक्समध्ये पटकावले पहिले सुवर्णपदक

भारताने अॅथलेटिक्समध्ये पटकावले पहिले सुवर्णपदक

महिला ४x४०० मीटर रिलेमध्ये ऐतिहासिक विजय

Google News Follow

एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय महिला अॅथलेटिक्स संघाने शानदार कामगिरी करत ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले. किरण पहल, एम. पूवम्मा, प्राची आणि विथ्या रामराज यांच्या भारतीय संघाने अत्यंत चुरशीच्या झालेल्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. भारतीय संघाने ३ मिनिटे २९.६९ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय धावपटूंनी आघाडी कायम ठेवली आणि शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात विथ्या रामराजने वेग वाढवत भारताचा विजय निश्चित केला.

शर्यतीत बहरीनच्या संघाने भारतीय धावपटूंना अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. मात्र भारतीय खेळाडूंनी उत्तम समन्वय, वेग आणि संयमाच्या जोरावर अंतिम रेषा सर्वप्रथम पार केली. बहरीनला रौप्यपदक, तर चीनला कांस्यपदक मिळाले. या विजयामुळे एशियन गेम्समधील अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या खात्यात महत्त्वाच्या सुवर्णपदकाची भर पडली आहे. भारतीय महिला रिलेमधील या कामगिरीमुळे देशाच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, खेळाडूंच्या शानदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारताचे हे सहावे सुवर्णपदक ठरले आहे. भारताची पदक संख्या ६ सुवर्ण, २१ रौप्य आणि २२ कांस्य — एकूण ४९ पदके झाली आहे. या सुवर्ण पदकामुळे भारताचा टॉप १० मध्ये समावेश झाला आहे.
हे ही वाचा:
सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म १४-१५ वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक

१८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद होणार?

कोठी क्रमांक ९६० पंजाबमध्ये ‘आप’चे लफडा सदन

बांगलादेशात अणुइंधन नेणाऱ्या रशियन विमानाला पाकने एअरस्पेस नाकारली

या सुवर्णपदकामुळे विथ्या रामराजच्या यशातही आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या स्पर्धेत तिने याआधी ४०० मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक पटकावले होते, तर मिश्र ४x४०० मीटर रिलेमध्ये तिने रौप्यपदक जिंकले होते. आता महिला ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवत तिने एशियन गेम्समधील आपल्या पदकांची संख्या तीनवर नेली आहे. भारतीय महिला धावपटूंच्या या दमदार कामगिरीमुळे ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा