29 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरविशेषसीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म १४-१५ वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक

सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म १४-१५ वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक

आठ मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर, ठाण्यातच थांबणार

Google News Follow

Related

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामाला वेग देण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर तब्बल ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक १ ऑक्टोबर २०२६ ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत राहणार आहे. रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (आरएलडीए) पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांचा हा भाग असून, यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर घेण्यात आलेल्या ब्लॉकनंतर आता पुढील टप्प्यातील कामे केली जाणार आहेत.

या ७५ दिवसांच्या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर पायाभरणी आणि इतर आवश्यक पायाभूत कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी आरएलडीएकडून रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात येतील. या ब्लॉकचा थेट परिणाम काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवांवर होणार असून, १ ऑक्टोबरपासून निवडक गाड्या सीएसएमटीऐवजी दादर किंवा ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत.
हे ही वाचा:
१८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद होणार?

कोठी क्रमांक ९६० पंजाबमध्ये ‘आप’चे लफडा सदन

इंग्लंडमधील भारतीय वंशाची बोधना शिवानंदन ११व्या वर्षी बनली ग्रँडमास्टर

बांगलादेशात अणुइंधन नेणाऱ्या रशियन विमानाला पाकने एअरस्पेस नाकारली

दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्यांमध्ये बल्लारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस (११००२), हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस (१२८१०), अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस (१२११२), भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस (११०२०), मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस (२२१२०), बिदर-सीएसएमटी एक्स्प्रेस (२२१४४) आणि लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस (२२१०८) यांचा समावेश आहे. तर मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस (१२१३४) ही गाडी ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.

सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानकातील पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना भविष्यात अधिक सक्षम आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. मात्र, या कालावधीत सीएसएमटीला जाणाऱ्या प्रवाशांना काही गाड्यांसाठी दादर किंवा ठाणे येथेच प्रवास समाप्त करावा लागणार असल्याने गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी १ ऑक्टोबरपासून आपल्या प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेच्या बदललेल्या सेवेची माहिती लक्षात घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा