30.1 C
Mumbai
Monday, October 12, 2026
घरस्पोर्ट्ससामना एकीकडे, पाकिस्तानी व्हॉलीबॉल संघ गेला दुसरीकडे

सामना एकीकडे, पाकिस्तानी व्हॉलीबॉल संघ गेला दुसरीकडे

आशियाई क्रीडा स्पर्धेतला सामन्याला झाला उशीर

Google News Follow

Related

२०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पाकिस्तानच्या व्हॉलीबॉल संघासोबत एक विचित्र प्रकार घडला. उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी निघालेल्या पाकिस्तानच्या संघाला घेऊन जाणारी बस चक्क चुकीच्या ठिकाणी पोहोचली. त्यामुळे संघाला निर्धारित वेळेत सामन्याच्या मैदानावर पोहोचता आले नाही. या गोंधळामुळे पाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांच्यातील सामना तब्बल ४५ मिनिटे उशिराने सुरू करण्यात आला. सामन्यापूर्वीच्या तयारीवरही या प्रकाराचा परिणाम झाला.

पाकिस्तानचा संघ ज्या ठिकाणी सामना होणार होता, तिथे जाण्याऐवजी बस दुसऱ्याच व्हॉलीबॉल स्थळावर पोहोचली. चुकीच्या ठिकाणी पोहोचल्याचे लक्षात आल्यानंतर संघाला पुन्हा निर्धारित मैदानाकडे रवाना करण्यात आले. त्यामुळे खेळाडूंना वॉर्मअप आणि सामन्यापूर्वीच्या तयारीसाठी अपेक्षित वेळ मिळाला नाही. परिस्थिती इतकी गोंधळाची झाली की काही खेळाडूंना बसमध्येच सामन्याचा पोशाख बदलावा लागल्याचे समोर आले. या प्रकारामुळे पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
हे ही वाचा:
भारताने अॅथलेटिक्समध्ये पटकावले पहिले सुवर्णपदक

सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म १४-१५ वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक

१८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद होणार?

बांगलादेशात अणुइंधन नेणाऱ्या रशियन विमानाला पाकने एअरस्पेस नाकारली

दरम्यान, या वाहतूक गोंधळाबद्दल आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आयोजकांनी पाकिस्तानच्या संघाची माफी मागितली. संघांना योग्य बस आणि योग्य स्थळी पाठवण्यात झालेल्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या सर्व गोंधळाचा पाकिस्तानच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. मैदानावर उतरल्यानंतर पाकिस्तानने उझबेकिस्तानचा ३-० असा पराभव करत सामना आपल्या नावावर केला. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी पोहोचलेल्या बसपासून सुरू झालेला हा गोंधळ अखेर पाकिस्तानसाठी विजयाच्या रूपात संपला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा