28.4 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषइराणचा संयुक्त राष्ट्रांवर ‘शोले’ स्टाईल हल्लाबोल

इराणचा संयुक्त राष्ट्रांवर ‘शोले’ स्टाईल हल्लाबोल

मीम शेअर करत साधला निशाणा

Google News Follow

अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील इराणच्या दूतावासाने संयुक्त राष्ट्रांवर निशाणा साधला आहे. दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेली पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. ‘शोले’ चित्रपटातील ठाकूर बलदेव सिंह यांच्या व्यक्तिरेखेचा वापर करत संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारा मीम शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये दोन चित्रे एकमेकांसमोर ठेवण्यात आली असून एका बाजूला मार्व्हलच्या ‘डॉक्टर स्ट्रेंज’चे अनेक हात असलेले चित्र दाखवण्यात आले असून त्यावर ‘UN according to school books’ म्हणजेच ‘शालेय पुस्तकांनुसार संयुक्त राष्ट्र’ असे लिहिले आहे. दुसऱ्या बाजूला ‘शोले’ चित्रपटातील संजीव कुमार यांनी साकारलेला ठाकूर दाखवण्यात आला असून त्यावर ‘UN in reality’ म्हणजेच ‘वास्तवातील संयुक्त राष्ट्र’ असे लिहिण्यात आले आहे.

‘शोले’मध्ये ठाकूरचे दोन्ही हात कापले जातात. त्यामुळे या व्यक्तिरेखेचा वापर करत इराणने संयुक्त राष्ट्रांकडे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी अधिकार असले तरी प्रत्यक्ष मोठ्या संघर्षांमध्ये त्यांची अंमलबजावणी करण्याची क्षमता मर्यादित असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा:

बडगाममध्ये लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख दहशतवादी मूसा ठार

काठुआत सीआयएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार

ठाण्यात उबाठा नेते प्रदीप ‘बाळा’ पूर्णेकर यांच्यावर गोळीबार

सामना एकीकडे, पाकिस्तानी व्हॉलीबॉल संघ गेला दुसरीकडे

इराणने हा मीम अशा वेळी शेअर केला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे. संयुक्त राष्ट्रांकडून तणाव कमी करण्यासाठी आणि चर्चेचा मार्ग स्वीकारण्यासाठी आवाहन करण्यात येत असतानाच संघर्ष सुरू राहिल्याचा संदर्भ इराणच्या या पोस्टच्या पार्श्वभूमीवर दिला जात आहे. इराणच्या राजनैतिक यंत्रणेकडून सोशल मीडियावर मीम्स, व्यंगचित्रे, पॉप कल्चर आणि एआय-निर्मित व्हिडीओच्या माध्यमातून संदेश देण्याचा वापर वाढला आहे. इराणच्या विविध दूतावासांकडून अशा पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा