29.1 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरविशेषदुबईत स्मित यांच्या कुटुंबीयांची भारतीय राजदूतांनी घेतली भेट

दुबईत स्मित यांच्या कुटुंबीयांची भारतीय राजदूतांनी घेतली भेट

सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

Google News Follow

Related

संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि कॉन्सल जनरल (महावाणिज्यदूत) ई. विष्णू वर्धन रेड्डी यांनी फ्लाइट एफझेड १०७३ मध्ये जीवाची पर्वा न करता १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे कॅप्टन स्मित माछर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

यूएईतील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. त्यात म्हटले आहे, “यूएईतील भारताचे राजदूत डॉ. दीपक मित्तल आणि कॉन्सल जनरल डॉ. ई. विष्णू वर्धन रेड्डी यांनी कॅप्टन स्मित माछर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.” यावेळी त्यांनी कुटुंबीयांना दूतावास आणि वाणिज्य दूतावासाकडून सातत्याने सर्वतोपरी मदत केली जाईल, तसेच यूएईच्या अधिकाऱ्यांशी संपर्क कायम ठेवला जाईल, असे आश्वासन दिले. यासोबतच त्यांनी अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी कॅप्टन माछर यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

हे ही वाचा:

अमेडियात ९९ टक्के हिस्सा असताना पार्थ पवार आरोपी का नाहीत?

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात नऊ जण दगावले

शाहजहांपुरमध्ये मंदिराच्या जमिन वादावरून दोन साधूंना जाळले

पाकिस्तानातून हवालामार्गे पैसा, यासिन मलिकसह सात जणांवर आरोप निश्चित

बुधवारी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाला दुर्घटनाग्रस्त करण्याचा प्रयत्न भारतीय पायलट कॅप्टन स्मित माछर यांनी हाणून पाडला. या धाडसी प्रयत्नात ते गंभीर जखमी झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओमध्ये ते रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहेत. गंभीर जखमी असतानाही कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. कॅप्टन माछर यांच्या प्रयत्नांना यश आले आणि विमानाचे सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. सध्या स्मित माछर रुग्णालयात दाखल असून, त्यांच्या धैर्याचे देश-विदेशातून कौतुक होत आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांनी त्यांच्या देशाच्या वतीने कॅप्टन माछर यांचे आभार मानले आहेत. तर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांना हिरो संबोधले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा