29.3 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरराजकारणअभिजित दिपके दिमागी नक्षल

अभिजित दिपके दिमागी नक्षल

आमदार अतुल भातखळकर यांनी केली टीका

Google News Follow

Related

शिवाजी पार्क येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी खरपूस टीका केली. ते म्हणाले की, अभिजित दिपकेचे आंदोलन हे राजकीय आहे. त्यांचा अजेंडा मोदी हटाव हा आहे. त्यामुळे शिवाजी पार्कला त्यांनी निदर्शने केली. न्यायालयाने इथे आंदोलनांवर बंदी घातली आहे. शिवाजी पार्कमध्ये पोलिस परवानगी नाही तरीही ज्यांचा घटनेवर विश्वास नाही, कायद्यावर विश्वास नाही, त्यांचा अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणूनच अभिजित दिपके हा दिमागी नक्षल आहे असे वाटते.

आणखी एका प्रश्नावर बोलताना आमदार भातखळकर म्हणाले की, ठाकरे बंधूंनी जरूर आंदोलन करावे. आझाद मैदानावर आंदोलन करावे. आपण शिवाजी पार्कवर आंदोलन करणार अशा प्रकारची कायदाविरोधी भूमिका जी घेतली जात आहे, त्यावरून त्यांचा हेतू वेगळा आहे असे वाटते.

हे ही वाचा:

आरबीआयकडून रेपो दर वाढणार?

अखेरच्या क्षणी बाजी पलटली; सुजीतच्या गळ्यात सुवर्ण!

दिनो मोरियाला ‘मिठी’ भोवली

“हिंदुस्तानी जीव घेणारे नाही, जीव वाचवणारे”

भातखळकर म्हणाले की, कर्जमुक्तीचं वचन निवडणुकीच्या वेळेला आम्ही दिले होते. निवडणूक नसताना कर्जमुक्तीचं वचन आम्ही पाळलेले आहे. बोले तैसा चाले या वाक्यप्रचारानुसार आम्ही काम करतो. देवेंद्र फडणवीस आणि भाजपा या राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

पूर्णेकर यांची हत्या ही घटना दुर्दैवी आहे. पोलिस तपास सुरू आहे. काही लोकांना अटक केलेली आहे. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असेही आमदार भातखळकर म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा